जिल्ह्यातील सरपंचपदासाठी ८ डिसेंबर रोजी आरक्षण सोडत
By | Updated: November 28, 2020 04:08 IST2020-11-28T04:08:34+5:302020-11-28T04:08:34+5:30
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल व मार्च महिन्यांत संपलेली आहे. मात्र, कोरोनाचा कहर सुरू असल्यामुळे तसेच लॉकडाऊन सुरू असल्याने ...

जिल्ह्यातील सरपंचपदासाठी ८ डिसेंबर रोजी आरक्षण सोडत
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल व मार्च महिन्यांत संपलेली आहे. मात्र, कोरोनाचा कहर सुरू असल्यामुळे तसेच लॉकडाऊन सुरू असल्याने निवडणुकांचा कार्यक्रम शासनाकडून लांबविण्यात आला होता. मात्र, आता शासनाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली असून, यासाठी आरक्षण सोडत काढण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही या आदेशात देण्यात आलेल्या आहेत. यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तालुक्यातील नऊ तहसीलदारांना ८ डिसेंबर रोजी तालुकास्तरावर विशेष सभा घेऊन सरपंचपदांचे आरक्षण काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे गावांमधील राजकीय वातावरण तपायला सुरुवात झाली आहे. या सोडतीत सोयगाव तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे.