पं़स़ सभापतीसाठी आरक्षण सोडत

By Admin | Updated: January 6, 2017 00:18 IST2017-01-06T00:15:51+5:302017-01-06T00:18:58+5:30

लातूर : पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी रोजी सोडत काढली जाणार आहे़

Leaving the Reservation for the Panchya Sabha Speaker | पं़स़ सभापतीसाठी आरक्षण सोडत

पं़स़ सभापतीसाठी आरक्षण सोडत

लातूर : पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी रोजी सोडत काढली जाणार आहे़ प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात दुपारी ३ वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे़
लातूर जिल्ह्यात १० पंचायत समित्या आहेत़ पंचायत समितीच्या सभापतीपदाचे व त्यांना सध्या लागू असलेले आरक्षण संपत आले आहे़ त्यामुळे पुढील अडीच वर्षांच्या कालावधीकरिता प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे़
अनुसूचित जातीसाठी राखीव सभापती पदांची संख्या १ असून व अनुसूचित जातीतील महिलांसाठी १ सभापतीपद राखीव आहे़ अनुसूचित जमातीसाठी सभापती पद आरक्षित करण्यात येणार नाही़ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तीन सभापतीपद आरक्षित आहेत़ त्यात पुरूषांसाठी १, महिलांसाठी २ सभापतीपद आरक्षित केले जातील़ खुल्या प्रवर्गासाठी ३ सभापतीपद आरक्षित आहेत़ त्यात महिलांसाठी २ सभापतीपदाचे आरक्षण निघेल़ पुढील अडीच वर्षाच्या कालावधीकरिता हे आरक्षण काढले जाणार आहे़
जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात चिठ्ठ्या काढून सोडत काढली जाणार आहे़

Web Title: Leaving the Reservation for the Panchya Sabha Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.