शेतकऱ्यांच्या तोंडाला केंद्राने पाने पुसली
By Admin | Updated: September 6, 2014 00:26 IST2014-09-05T23:50:25+5:302014-09-06T00:26:32+5:30
हिंगोली : ‘माय वाढेना अन् बाप खाऊ देईना’ अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था संपण्याच्या मार्गावर नाही.

शेतकऱ्यांच्या तोंडाला केंद्राने पाने पुसली
हिंगोली : ‘माय वाढेना अन् बाप खाऊ देईना’ अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था संपण्याच्या मार्गावर नाही. यंदाही त्याची प्रचिती अधिकच येणार असल्याचे नुकतेच केंद्र शासनाकडून एमएसपीने जाहीर केलेल्या हमीभावावरून दिसून येते. मूग, हरभरा आणि सुर्यफूल वगळता एकाही पिकांचे दर ५० रूपयांच्या पुढे वाढले नसल्याने भाजपाचे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यात हिंगोली बाजार समितीत वर्षभर हरभरा हमीपेक्षा कमी दराने विकला गेल्याने शेतकऱ्यांना कोणी वाली नसल्यासारखी अवस्था झाली आहे.
नवीन सरकारने अपेक्षा वाढवून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे हमीभावाकडे डोळे लागले होते. नुकताच केंद्रीय कृषी विभागाने हमीभाव जाहीर करताच शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. खरीप, रबी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामातील तीन पिके वगळता सर्व पिकांच्या दरात ५० रूपयांच्या पुढे वाढ झालेली नाही. हरभरा, मूगाच्या दरात १०० आणि सूर्यफुलात २०० रूपयांची वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिली. उर्वरित एकाही पिकांच्या दरात उल्लेखनीय वाढ झालेली नाही. परिणामी यंदाच्या विपरित परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची शक्यता वाटते. कारण २ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आणि ८६ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली. साडेचारपैकी तीन लाख हेक्टरवर पेरणी झालेल्या नगदी पिकांच्या दरांत केवळ ५० रूपयांची वाढ केली. गतवर्षी सोयाबीनचे २२० तर कापसाच्या दरात १०० रूपयांची वाढ केली होती. यंदा सुर्यफूल २००, हरभरा आणि मुगात १०० रूपयांची वृद्धी केली; परंतु या तिन्हीही पिकांचे मिळून जिल्ह्यात ९ हजार ३१३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. परिणामी वाढलेल्या दराचा फायदा कास्तकारांना होणार नाही. दुसरीकडे याच दरापेक्षा कमी दराने खरेदी होण्याचे प्रकार हिंगोली बाजार समितीत गतवर्षी घडले. वर्षभर हरभऱ्याची खरेदी हमीपेक्षा ३०० रूपयांच्या कमी दरावर केली. तरीही समिती आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने याकडे कानाडोळा केला. यंदाही त्याची प्रचिती आली तर डोक्यावर हात मारण्याची वेळ उत्पादकांवर येईल.
खरीप, रबी पिकांच्या आधारभूत किमती
पिके २०११-१२ १२-१३ १३-१४ १४-१५
भात सामान्य दर्जा १०८० १२५०१३१०१३६०
भात अ दर्जा १११० १२८०१३४५१४००
ज्वारी हायब्रीड९८०१५००१५००१५३०
ज्वारी मालदांडी१०००१५२०१५२०१५५०
बाजरी ९८० ११७५१२५०१२५०
नाचनी १०५० १५००१५००१५५०
मका ९८० ११७५१३१०१३१०
तूर ३२०० ३८५०४३००४३५०
मूग ३५०० ४४००४५००४६००
उडीद ३३०० ४३००४३००४३५०
भूईमूग २७००३७००४०००४०००
काळे सोयाबीन१६५०२२००२५००२५००
पिवळे सोयाबीन१६९०२२४०२५६०२५६०
तीळ ३४००४२००४५००४६००
मध्यम धागा कापूस२८००३६००३७००३७५०
लांब धाका कापूस३३००३९००४०००४०५०
गहू ११२०१२८५१३५०१४००
हरभरा २१००२८००३०००३१००
मसूर २२५०२८००२९००२९५०
मोहरी १८५०२५००३०००३०५०
सूर्यफूल १८००२५००२८००३०००
साखर १४५१७०२१०२२०