डिग्रस बंधाऱ्यातून ८दलघमी पाणी सोडणार
By Admin | Updated: July 22, 2014 00:17 IST2014-07-21T23:53:07+5:302014-07-22T00:17:17+5:30
पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डिग्रस बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली आहे.

डिग्रस बंधाऱ्यातून ८दलघमी पाणी सोडणार
पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डिग्रस बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली आहे.
तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातील पाणी पळविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी सक्रिय झाले आहेत. डिग्रस बंधाऱ्यातील नांदेड जिल्ह्यासाठीचे आरक्षित पाणी सोडावे यासाठी हालचाली केल्या जात आहेत.
पाणी सोडताना अनेकांचा होणारा विरोध फोडून काढण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. डिग्रस बंधाऱ्यात सध्या २१ दलघमी पाण्याचा साठा आहे. पाऊस न पडल्यास पालम, पूर्णा व गंगाखेड तालुक्याची तहान या पाण्यावर भागू शकते. परंतु या साठ्यापैकी ८ दलघमी पाणी सोडले जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. दोन महिन्यांपूर्वी पाणी सोडताना जि.प. सभापती गणेशराव रोकडे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांंनी विरोध केला होता. त्यामुळे डिग्रस बंधाऱ्यात पाणीसाठा राहिलेला आहे.
दुष्काळाचे संकट तालुक्यावर घोंगावत असताना पाणी सोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्याने जनतेमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पाणी नेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील पुढारी व अधिकारी एकवटले आहेत. परंतु परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मात्र पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळालेला नाही. ही दुर्दैवी बाब आहे.
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींना देण्यात येते परंतु या लोकप्रतिनिधींचा आवाज मात्र थंडावला आहे. (प्रतिनिधी)
२४ जुलै रोजी पाणी सोडणार?
पाणी सोडण्यासाठी विरोध करणाऱ्या गोरगरीब जनतेला मात्र लाठ्याकाठ्या खाण्याची वेळ येत आहे. बंधाऱ्यातील पाणी सोडताना अनेकांचा विरोध मोडूून काढण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार, अशी चिन्हे दिसत आहेत. २४ जुलै रोजी पाणी सोडण्याची तारीख ठरविली जाण्याची शक्यता आहे. डिग्रस बंधाऱ्याला पोलिस अधीक्षक संदीप पाटील, नियती ठाकर, उपविभागीय पोलिस अधिकारी जटाळे आदींनी भेट देऊन पाहणी केली आहे.