‘पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सोडा’

By Admin | Updated: June 29, 2017 00:28 IST2017-06-29T00:24:22+5:302017-06-29T00:28:16+5:30

नांदेड: जिल्ह्यातील व परिसरातील वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी नांदेड - पंढरपूर अशी विशेष रेल्वे सोडावी, अशी मागणी सेनेचे आ़हेमंत पाटील यांनी केली आहे़

'Leave special railway for Pandharpur' | ‘पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सोडा’

‘पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सोडा’

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्ह्यातील व परिसरातील वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी नांदेड - पंढरपूर अशी विशेष रेल्वे सोडावी, अशी मागणी सेनेचे आ़हेमंत पाटील यांनी विभागीय व्यवस्थापक एम़ के़ सिन्हा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़
४ जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेचा सोहळा होणार आहे़ आषाढी एकादशीनिमित्त त्या दिवशी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला जातात़ नांदेड जिल्ह्यातूनही लाखो भाविक पंढरपूरला जातात़ एसटी महामंडळाने त्यासाठी २०५ अतिरिक्त बसेस सोडल्या आहेत़ त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनानेही या मार्गावर विशेष रेल्वे सोडल्यास वारकऱ्यांची मोठी अडचण दूर होणार आहे़

Web Title: 'Leave special railway for Pandharpur'