‘उजव्या कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडा’
By Admin | Updated: July 14, 2017 00:29 IST2017-07-14T00:26:35+5:302017-07-14T00:29:08+5:30
गेवराई : तालुक्यातून जाणाऱ्या उजव्या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारी सकाळी गेवराई-शेवगाव मार्गावरील तळणेवाडी फाट्यावर तब्बल दीड तास रस्ता रोको केले.

‘उजव्या कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडा’
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातून जाणाऱ्या उजव्या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारी सकाळी गेवराई-शेवगाव मार्गावरील तळणेवाडी फाट्यावर तब्बल दीड तास रस्ता रोको केले. तसेच शासनाच्या विरोधात घोषणा देत उजव्या कालव्यात उतरून आंदोलन केले. यामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
जायकवाडीचा उजवा कालवा गेवराई तालुक्यातुन जातो. याच कालव्याच्या भरवशावर शेतकरी असतात. त्यातच पावसाने हुलकावणी दिल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे उजव्या कालव्यात शेतीसाठी तात्काळ पाणी सोडावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेवराई-शेवगाव रोडवरील तळणेवाडी फाटा येथे रास्ता रोको करुन उजव्या कालव्यात उतरून आंदोलन केले. लेखी आश्वासनानंतरच आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा घेतला होता. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बी.के शेळके, बोरगाव शाखा अधिकारी एस.एस फाळके, मंडळ अधिकारी निशांत ठाकूर, गजानन देशमुख यांनी १७ तारखेपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले.