भाजपला सोडचिठ्ठी द्या, अन्यथा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:58 IST2017-09-17T00:58:01+5:302017-09-17T00:58:14+5:30
शिवसेनेने शनिवारी राजकीय अस्त्र बाहेर काढले. भाजपच्या इशाºयावर नाचणे बंद न केल्यास अविश्वास ठरावाच्या हालचालींना वेग देण्यात येईल, असा सज्जड दम आयुक्तांना भरण्यात आला आहे.

भाजपला सोडचिठ्ठी द्या, अन्यथा !
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मागील काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाने भाजपच्या काही ‘विशेष’ पदाधिकाºयांच्या सांगण्यावरून धूमधडाक्यात निर्णय घेणे सुरू केले. या निर्णयप्रक्रियेत शिवसेनेला सोबत घेण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेनेने शनिवारी राजकीय अस्त्र बाहेर काढले. भाजपच्या इशाºयावर नाचणे बंद न केल्यास अविश्वास ठरावाच्या हालचालींना वेग देण्यात येईल, असा सज्जड दम आयुक्तांना भरण्यात आला आहे.
महापालिकेत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. सत्तेसाठी शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी भाजपसोबत युती केली. मागील काही महिन्यांपासून भाजपने सेनेला डिवचण्याची कोणतीच संधी सोडलेली नाही. प्रत्येक वेळी सेनेने नमते घेतले. युतीधर्म एकट्या शिवसेनेकडूनच पाळण्यात येऊ लागला. महापालिकेतील निर्णयप्रक्रियेतून सेनेला चक्क बाजूला करण्यात आले. भाजपमधील काही ‘विशेष’ पदाधिकाºयांनी भोकरदनमार्गे आयुक्तांवर अगोदर दबाव निर्माण केला. त्यानंतर सोयीनुसार मोठ-मोठे निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडले.
पालकमंत्री रामदास कदम यांनी भ्रष्ट अधिकाºयांना सेवेत घेऊ नका म्हटले की, दुसºयाच दिवशी अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली. पालकमंत्री शहरात आलेले असतानाही मनपातील वरिष्ठ अधिकाºयांनी त्यांच्या दौºयाकडे पाठ फिरविली. मागील काही दिवसांतील अनेक निर्णय सेनेच्या जिव्हारी लागले आहेत. सेनेच्या संयमाचा बांध शनिवारी फुटला. उपमहापौर स्मिता घोगरे आणि सभागृहनेता गजानन मनगटे यांनी शनिवारी दुपारी आयुक्तांची अॅन्टी चेंबरमध्ये भेट घेतली. या भेटीत अप्रत्यक्षपणे दोन्ही पदाधिकाºयांनी आयुक्तांना इशारा दिला की, यापुढे भाजपसोबत वाढलेले प्रेम आणि जिव्हाळा कमी करा; अन्यथा परिणाम वाईट होतील. यापूर्वी सेनेनेच आघाडी घेत तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता.
महापौर निवडणुकीचेही निमित्त...
भाजपने महापौर निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली आहे. यंदा महापौरपद सेनेच्या कोट्यात आहे. सेनेकडून हे पद हिसकावून घेण्याची भाषा भाजप नेत्यांकडून सुरू आहे. महापालिकेत शिवसेना म्हणेल तीच दिशा...असते हे दाखवून देण्यासाठी शनिवारी शिवसेनेनेही कंबर कसून विरोध दर्शविण्यास सुरुवात केली.