प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती

By Admin | Updated: September 1, 2014 00:27 IST2014-09-01T00:07:18+5:302014-09-01T00:27:21+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती

Leakage to primary health center | प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती

प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती

ताडकळस पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत आहे़ सध्या पाऊस पडत असल्याने ही इमारत जागोजागी गळू लागली आहे़ त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे़
तालुक्यातील लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठे गाव म्हणून ताडकळस ओळखले जाते़ या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून, केंद्राची इमारत जुनाट झाली आहे़
गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने रुग्णालय जागोजागी गळू लागले आहे़ त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय होत आहे़ पावसाळ्यापूर्वीच या रुग्णालयाची डागडुजी संबंधित विभागाने करणे गरजेचे होते़ परंतु, ते न केल्यामुळे हा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे़ परंतु याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़

Web Title: Leakage to primary health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.