अतिदक्षता विभागाला गळती; रुग्णांची गैरसोय

By Admin | Updated: May 30, 2014 00:24 IST2014-05-29T23:35:09+5:302014-05-30T00:24:07+5:30

लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या छतास गळती लागली आहे़

Leakage to the intensive care unit; Disadvantages of Patients | अतिदक्षता विभागाला गळती; रुग्णांची गैरसोय

अतिदक्षता विभागाला गळती; रुग्णांची गैरसोय

 लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या छतास गळती लागली आहे़ परिणामी रुग्णांबरोबरच कर्मचारी हैराण झाले आहेत़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा मिळत असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ त्यामुळे दररोज किमान ९०० जवळपास रुग्ण तपासणीसाठी येतात़ एक नवी व दोन जून्या इमारती आहेत़ दोन मजली असलेल्या जून्या इमारतीतील अतिदक्षता विभागास सध्या गळती लागली आहे़ दुर्गंधी वाढली... वैैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासनाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरून दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे रुग्ण, नातेवाईक तसेच आरोग्य कर्मचार्‍यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असतानाही अतिदक्षता विभागास गळती लागल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु, या विभागाच्या वरील मजल्यातून पाणी टपकत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वरच्या मजल्यातील पाणी येत आहे. परंतु, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

Web Title: Leakage to the intensive care unit; Disadvantages of Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.