शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

९०० मिमी जलवाहिनीला लिकेज; कंत्राटदाराने गाठला निकृष्टतेचा कळस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:12 IST

२०० कोटी रुपये खर्चून टाकण्यात आलेल्या २०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून गेवराई गाव येथे पाणी वाहत आहे.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तब्बल २०० कोटी रुपये खर्चून जायकवाडी ते फारोळा पर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी आठ महिन्यांपूर्वी टाकली. आता या जलवाहिनीला ठिकठिकाणी लिकेज असल्याचे उघडकीस येत आहे. जलवाहिनीचे जॉइंट व्यवस्थितपणे जोडण्यात आले नसल्याचे समोर येत आहे.

२,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत शहराला पुरेसे पाणी मिळावे, या उदात्त हेतूने २०० कोटी रुपयांची जलवाहिनी अत्यंत घाईघाईत टाकण्यात आली. या जलवाहिनीतून शहराला ७५ एमएलडी पाणी मिळेल, असा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात सहा महिन्यांपासून फक्त १८ ते २० एमएलडी पाणी येत आहे. सध्या ही जलवाहिनी टाकून शहराला फारसा दिलासा मिळालेला नाही. या जलवाहिनीसाठी २६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र फारोळा येथे तयार करण्यात येत आहे. दोन वर्षे होत आली तरी जलशुद्धीकरणाचे काम काही होईना. कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही हे काम होत नाही. त्यातच आता जलवाहिनीच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गेवराई गाव येथे जलवाहिनीला लिकेज असल्याचे उघडकीस आले. त्यातून पाणी वाहत आहे. जलवाहिनी बंद केल्यावर दूषित पाणी पुन्हा त्यात जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अद्याप जलवाहिनी मनपाकडे हस्तांतरित केली नाही.

जलवाहिनीवर फक्त १ पंप सुरूमागील सहा महिन्यांपासून जलवाहिनीवर सध्या एकच पंप चालविण्यात येत आहे. त्यातून १८ ते २० एमएलडी पाणी जलवाहिनीतून येत आहे. जेव्हा तीन पंप सुरू करून ७५ एमएलडी पाणी जलवाहिनीतून आणण्याचे काम सुरू होईल, तेव्हा अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटणार हे निश्चित. या जलवाहिनीचे जॉइंट अत्यंत कमकुवत दर्जाचे आहेत. फक्त एक पाईप दुसऱ्या पाईपमध्ये अडकवून सोडून देण्यात आले. प्रत्येक जॉइंट व्यवस्थित बसविला नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर