आघाडी- एमआयएम एकत्र येण्याच्या हालचाली

By Admin | Updated: December 31, 2016 22:09 IST2016-12-31T22:09:29+5:302016-12-31T22:09:52+5:30

ब्ाीड : येथील पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद खेचण्यात यशस्वी झालेल्या राष्ट्रवादीला प्रबळ विरोध करण्यासाठी काकू-नाना विकास आघाडी व एमआयएम एकत्रित येण्याचे संकेत आहेत.

Leadership- MIM Combination Movements | आघाडी- एमआयएम एकत्र येण्याच्या हालचाली

आघाडी- एमआयएम एकत्र येण्याच्या हालचाली

ब्ाीड : येथील पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद खेचण्यात यशस्वी झालेल्या राष्ट्रवादीला प्रबळ विरोध करण्यासाठी काकू-नाना विकास आघाडी व एमआयएम एकत्रित येण्याचे संकेत आहेत. उपनगराध्यक्षपदापासून राकाँला दूर ठेवण्यासाठी आघाडीे व एमआयएम यांच्यात हातमिळवणी होण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.
थेट जनेतून नगराध्यक्ष होण्याचा मान पुन्हा एकदा डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना मिळाला आहे. मात्र, उपनगराध्यक्षपदासाठी त्यांची कोंडी करण्याची संधी जि. प. सभापती संदीप क्षीरसागर हे गमावू इच्छित नाहीत. पालिकेत सध्या सर्वाधिक २० नगरसेवक आघाडीकडे आहेत. मात्र, उपनगराध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी त्यांना आणखी काही नगरसेवकांची मदत आवश्यक आहे. ९ नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या एमआयएमची मदत घेऊन उपनगराध्यक्ष पदासाठी मोट बांधण्याच्या अनुषंगाने संदीप क्षीरसागर यांनी रणनीती आखली आहे.
प्रभावी विरोधक देण्यासाठी विरोधी बाकावर बसू पाहणाऱ्या एमआयएमने आपली शक्ती आता आघाडीसोबत लावण्याची तयारी दर्शवली आहे. प्राथमिक चर्चेमध्ये एमआयएमने तसे संकेत दिले आहेत.
दरम्यान, नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी १० जानेवारी रोजी पालिकेत दुपारी १२.१५ वाजता पहिली सर्वसाधारण सभा बोलावली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेमध्ये उपनगराध्यक्ष पदाकरिता नामनिर्देशनपत्र भरावयाचे आहे.
नगरपालिका नियम २०१० चे नियम ३ अन्वये पालिका सदस्यांच्या एकूण संख्येच्या १० टक्के किंवा ५ यापैकी कमी असतील एवढे सदस्य नामनिर्देशित होऊ शकतात. त्यानुषंगाने एमआयएमकडे असलेल्या ९ सदस्यांचा स्वतंत्र गट पालिकेत विरोधी बाकावर बसणार आहे. मात्र, उपनगराध्यक्षपदासाठी त्यांची आघाडीला मदत मिळू शकते. तसे झाले तर आघाडी ठरवील तो सदस्य उपनगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारील. (प्रतिनिधी)

Web Title: Leadership- MIM Combination Movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.