शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे इच्छुकांच्या यादीत नेत्यांची मुले, माजी नगरसेवक; २९ प्रभागांसाठी ११२० अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:58 IST

एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेल्यामुळे पक्षासमोर योग्य उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे

छत्रपती संभाजीनगर : भाजपने महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक मैदानात येणाऱ्या इच्छुकांची माहिती मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत सुमारे ११२० इच्छुकांनी अर्ज घेत सोमवारपर्यंत दाखल केले. इच्छुकांमध्ये माजी नगरसेवक, उपमहापौर यांच्यासह नेत्यांच्या मुलांसह संघटना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे. २९ प्रभागांपैकी (११५ वॉर्ड) १६ प्रभागांत उमेदवारी देताना पक्षाची दमछाक होईल. उर्वरित १३ प्रभागांत भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नाहीत. अर्जांची छाननी झाल्यानंतर वस्तुस्थिती समजेल.

एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेल्यामुळे पक्षासमोर योग्य उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे, शिवाय उमेदवारी न मिळाल्यास निर्माण होणारी नाराजी थोपविण्यात कोअर कमिटीला अपयश आले, तर बंडखोरी होण्याचे संकेतही अर्जांच्या आकड्यांवरून दिसत आहेत.

महायुती झाली तर बंडखोरी निश्चितमहायुती झाली तर भाजपच्या वाट्याला २०२० पर्यंत असलेले २३ वॉर्ड म्हणजेच सुमारे ६ प्रभागांतील जागा येतील. त्यात माजी नगरसेवक, नेत्यांची मुलांचा आधी विचार होईल. त्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याला ‘ॲडजस्ट’ करण्याचा प्रयत्न होऊ शकेल. महायुती झाल्यास बंडखोरी निश्चित होईल, असा दावा अनेक इच्छुकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला.

बाहेरून आलेल्या किती जणांनी घेतले अर्ज?शिल्पाराणी वाडकर या गेल्या आठवड्यात पक्षात आल्या असून त्यांनी इच्छुक म्हणून पक्षाचा अर्ज घेतला आणि दाखल केला.

कोणत्या नेत्यांच्या मुलांचा अर्ज?खा. डॉ. भागवत कराड यांच्या चिरंजीव हर्षवर्धन कराड, आमदार संजय केणेकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन केणेकर यांनी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केले. तसेच डॉ. उज्ज्वला दहीफळे यांनीही अर्ज दाखल केला.

माजी पदाधिकारी, नगरसेवकांपैकी इच्छुकप्रमोद राठोड, विजय औताडे, साधना सुरडकर, संजय जोशी या माजी उपमहापौरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. स्थायी समितीमधील सुरेंद्र कुलकर्णी, दिलीप थोरात यांच्यासह नितीन चित्ते, रामेश्वर भादवे, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, महेश माळवतकर यांच्यासह २०१५ च्या यादीतील सुमारे २१ जणांनी अर्ज घेतले. समीर राजूरकर, माजी महापौर बापू घडमोडे यांनी अर्ज घेतले नाहीत.

नियोजनासाठी समितीभाजपने स्वतंत्र संचालन समिती नेमून सर्वांना जबाबदारीचे वाटप केले आहे. शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यावर मित्रपक्षाशी संपर्क ठेवण्याची तर माजी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये यांच्याकडे राष्ट्रीय तथा प्रदेश नेत्यांचे दौरे, सभा याचे नियोजन देण्यात आले आहे. जिल्ह्याचे प्रमुख म्हणून ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, निवडणूक प्रमुखपदी समीर राजूरकर असतील. प्रचार कार्यालय प्रमुख धनंजय कुलकर्णी, निवडणूक अधिकारी संपर्क ॲड. अमित देशपांडे, मीडियाप्रमुख सतीश छापेकर, सोशल मीडियाप्रमुख प्रतीक शिरसे यांच्यासह श्रीनिवास देव, राजेश मेहता, बापू घडमोडे, प्रशांत देसरडा, मनोज पांगारकर, संजय खनाळे, मुकुंद लाडकेकर, डॉ. उज्ज्वला दहिफळे, राहुल दांडगे, अरविंद डोणगावकर, अशोक मुळे, गणेश जोशी यांच्यावर विविध कामांची जबाबदारी असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP ticket hopefuls: Leaders' kin, ex-corporators vie; 1120 applications.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar BJP sees 1120 applications for corporation elections. Leaders' children and former corporators are among aspirants. Internal competition is fierce in 16 wards; alliance could trigger rebellion. The party formed committees for election management.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBJPभाजपाMunicipal Corporationनगर पालिका