पालिका शिक्षकांची जिल्हा कचेरीसमोर धरणे
By Admin | Updated: May 13, 2014 01:12 IST2014-05-12T23:26:09+5:302014-05-13T01:12:33+5:30
जालना : जालना नगरपालिका शाळांमधील शिक्षकांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

पालिका शिक्षकांची जिल्हा कचेरीसमोर धरणे
जालना : तीन महिन्यांच्या थकीत वेतनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जालना नगरपालिका शाळांमधील शिक्षकांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. नगरपालिकेच्या २१ शाळांमध्ये ११६ शिक्षक कार्यरत आहेत. त्यांचे डिसेंबर २०१३, जानेवारी व मार्च २०१४ चे वेतन अदा करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे फेबु्रवारी २०१४ चे वेतन ८० टक्केच देण्यात आले. पालिकेने २० टक्के रक्कम अदा केली नाही. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही उपयोग न झाल्याने शिक्षकांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला, असे प्राथमिक शिक्षक संघाच्या नगरपालिका शाखेचे अध्यक्ष रवींद्र खिल्लारे यांनी सांगितले. या आंदोलनात विलास भोईटे, सुरेश सांगुळे, अरूण जायभाये, एम.बी. गोन्टे, अशोक पवार, मंदा महाजन, शोभा टेकूर, ज्योती ठाकूर, मालती सुरडकर, रेखा गायकवाड, सय्यद इर्शाद, शांतीलाल बनसोडे, सतीश खरटमल, शिवरतन डवले, विवेक जाधव, तुकाराम कोल्हे, विजय चव्हाण, संजय बोरूडे, प्रकाश राठोड, हारूणखान, अब्दूल कादीर, मो. फैय्याज, अनिस अन्सारी, संध्या गायकवाड, अख्तर जहाँ, सुरेखा लालसरे, योजना भोपी, रेहाना बेगम, व्ही.एल. राऊत, संजय पिंपळे, संतोष बोकन आदी सहभागी झाले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब जुंबड यांनी या आंदोलनकर्त्यांची सोमवारी भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे. नगरपालिका प्रशासनाने ऐन सुट्यांच्या व लग्नसराईच्या काळात शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ आणली, ही बाब निषेधार्ह असल्याचे जुंबड म्हणाले. (प्रतिनिधी)