एलबीटीचे भिजत घोंगडे कायमच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:35 IST2017-09-20T00:35:35+5:302017-09-20T00:35:35+5:30
स्थानिक संस्था कर राज्यात बंद झाला असला तरी परभणीत मात्र या कराचा घोळ अजूनही मिटलेला नाही. परभणी महापालिकेच्या एल.बी.टी. विभागाने सुमारे तीन हजार व्यापाºयांना नोटिसा पाठविल्या असून, कागदपत्रे सादर करण्याचे सूचित केले आहे.

एलबीटीचे भिजत घोंगडे कायमच...!
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्थानिक संस्था कर राज्यात बंद झाला असला तरी परभणीत मात्र या कराचा घोळ अजूनही मिटलेला नाही. परभणी महापालिकेच्या एल.बी.टी. विभागाने सुमारे तीन हजार व्यापाºयांना नोटिसा पाठविल्या असून, कागदपत्रे सादर करण्याचे सूचित केले आहे.
परभणी शहरातील व्यापाºयांकडून महापालिका स्थानिक संस्था कर वसूल करीत होती. मात्र जुलै २०१५ पासून शासनाने स्थानिक संस्था कर बंद केला. या निर्णयामुळे व्यापाºयांत आनंदोत्सव साजरा करण्यात आला असला तरी स्थानिक संस्था कराची संपूर्ण वसुली महापालिकेला मिळालेली नाही. अनेक व्यापाºयांकडे एप्रिल ते जुलै २०१५ या चार महिन्यांतील व्यावसायाचे कागदपत्रे मनपाच्या स्थानिक संस्था कर विभागात दाखल करणे बाकी आहे. त्यामुळे या चार महिन्यांतील कर वसुलीही रखडलेली आहे. याच अनुषंगाने मनपाच्या स्थानिक संस्था कर विभागाने फॉर्म नं.एच. व्यापाºयांना दिला असून, या नोटिसीद्वारे वरील चार महिन्यांचे कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.