बाराव्या दिवशी लक्ष्मण वंगे यांचे उपोषण मागे

By Admin | Updated: April 8, 2017 21:43 IST2017-04-08T21:39:35+5:302017-04-08T21:43:54+5:30

लातूर :शेतकरी संघटनेचे नेते लक्ष्मणराव वंगे यांनी १२ व्या दिवशी (शनिवारी) बेमुदत उपोषण मागे घेतले़

Laxman Wang's fasting on the 12th day | बाराव्या दिवशी लक्ष्मण वंगे यांचे उपोषण मागे

बाराव्या दिवशी लक्ष्मण वंगे यांचे उपोषण मागे

लातूर : शासनाने नाफेड मार्फत तूर खरेदीत घोटाळा झाल्या प्रकरणातील दोषींवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन जिल्हा उपनिबंधक बी़एल़ वांगे यांनी दिल्याने अखेर शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते लक्ष्मणराव वंगे यांनी १२ व्या दिवशी (शनिवारी) आपले बेमुदत उपोषण मागे घेतले़
तूर खरेदी घोटाळा तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मणराव वंगे यांनी गांधी चौकात बेमुदत उपोषण सुरु केले होते़ दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रकाश पोहरे, शरद झरे, राजाराम पाटील, प्राचार्य मधुकर मुंडे, राम मसलगे, रावणराजे आत्राम, अ‍ॅड़ मधुकर कांबळे, जिल्हा उपनिबंधक बी़एल़ वांगे, नाफेडचे वाय़ ई़ सुमठाणे, प्रा. संतोष बडुरकर, डिंगबर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Web Title: Laxman Wang's fasting on the 12th day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.