शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

वकील दाम्पत्याची बनवाबनवी; एकच प्लॉट ६ जणांना विक्री करत सामान्यांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:57 IST

या प्रकरणात सातारा व सिटी चौक पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : गारखेडा परिसरातील स्वप्ननगरी येथे राहणाऱ्या वकील दाम्पत्याने गंगापूर जहाँगीर येथील काही प्लॉट पाच ते सहा जणांना विकून फसवणूक केली. तसेच, एक प्लॉट दोघांना तर एका प्लॉटचे बनावट मुख्यत्यारपत्र करून दिले. या प्रकरणात सातारा व सिटी चौक पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

हर्षल भागचंद शिंदे, सायली हर्षल शिंदे असे वकील दाम्पत्याचे नाव आहे. यांच्या विरोधात प्रभारी दुय्यम निबंधक औदुंबर लाटे, जगदीश रोजेकर यांनी सातारा पोलिस ठाण्यात, तर दुय्यम निबंधक आबासाहेब तुपे यांनी सिटी चौक पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. सिटी चौकमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयातून मालमत्तेची खरेदी-विक्री करण्याच्या सुविधेचा फायदा घेत पेशाने वकील असलेल्या शिंदे दाम्पत्याने दोन वर्षांत सुमारे सात जणांना एकच प्लॉट विकून लाखो रुपयांना गंडविले. याबाबत आलेल्या एका तक्रारीनुसार गंगापूर जहॉंगीर गट नं.१४१ मधील साई निवारा येथील ९६९ चौ. फूट क्षेत्रफळ असलेला प्लॉट न.१५ अनेकांना व पार्ट बी मधील प्लॉट नं.१४ दोघांना विकल्यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटले. सातारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण काळे, शैलेश देशमुख तपास करीत आहेत.

कामकाजावर परिणामबायपासवरील मुद्रांक नोंदणीच्या दोन्ही कार्यालयांतील दुय्यम निबंधकांना सातारा पोलिसांत ठाण्यात तक्रारीसाठी जावे लागल्यामुळे मुद्रांक नोंदणीवर परिणाम झाला. खरेदी-विक्रीसाठी आलेल्या अनेकांनी नाराजी दर्शवली.

असे फसविले अनेकांनाव्यवहार क्र. १दुय्यम निबंधक क्र. ३ जगदीश रोजेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे दाम्पत्याने प्लॉट नं. १४ दस्त नोंदणी क्र. ११३९१ / २०२४ नुसार २ लाख ८७ हजारांत करण गाणार (रा. चिकलठाणा) यांना व नंतर २ लाख ९० हजारांत शेखानी हबीब वली मोहम्मद (रा. बीड) यांना विकला.

व्यवहार क्र. २दुय्यम निबंधक क्र. ६ औदुंबर लाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे दाम्पत्याने प्लॉट नं. १५ दस्त नोंदणी क्र. ५६१८ / २०२५ नुसार ३ लाख ५० हजारांत स्वप्नाली पांडव (रा. नारळीबाग) यांना विकला.

व्यवहार क्र. ३दुय्यम निबंधक लाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे दाम्पत्याने प्लॉट नं. १५ दस्त नोंदणी क्रमांक ६८६८ / २०२५ नुसार ६ लाख ३० हजारांत संतोष सुकाशे रा. घोडेगाव यांना विकला.

व्यवहार क्र. ४दुय्यम निबंधक लाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे दाम्पत्याने प्लॉट नं. १५ दस्त नोंदणी क्रमांक १२०९३ / २०२५ नुसार ६ लाख ५० हजारांत शे.जुबेर शे.अब्दुल अजीज (रा. सिल्क मिल कॉलनी) यांना विकला.

व्यवहार क्र. ५दुय्यम निबंधक लाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे दाम्पत्याने दस्त नोंदणी क्रमांक १०५१३ / २०२५ नुसार दादासाहेब ठेंगल व इतर (रा. बीड) यांना मुखत्यारनामा व दस्त क्र.२०२४ पासून नोंदणीकृत असल्याचे भासवून बनावटरीत्या करून दिले. तसेच दोघांच्या स्वाक्षऱ्या करून कल्पना महाले (रा. सिडको महानगर १) यांच्या हक्कात जबाबाधारे शिंदे दाम्पत्याने गट नं.१४१ मधील प्लॉट क्र. सी ३३ विकला.

व्यवहार क्र. ६नोंदणी कार्यालय क्र. ६ मध्ये दस्त नोंदणी क्र.१०८३६/२०२५ नुसार दुय्यम निबंधक कार्यालय ५ मधील दस्त क्र.४३४६/२०२४ हे नोंदणीकृत असल्याचे भासविले. दुय्यम निबंधकांचे बनावट शिक्के तयार करून कबुली जबाबासाठी शिंदे दाम्पत्याने गट नं. १४१ मधील प्लॉट क्र.सी ३३ चे बनावट मुख्यत्यारपत्र बनवले.

English
हिंदी सारांश
Web Title : Lawyer Couple's Fraud: Sold Same Plot to Multiple People

Web Summary : A lawyer couple in Sambhajinagar defrauded several people by selling the same plot multiple times. They forged documents, including power of attorney, to deceive buyers. Police have registered cases against the couple following complaints from registration officials.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर