हार्टफुलनेस संस्थेतर्फे व्हर्च्युअल उपक्रमाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:02 IST2021-01-01T04:02:01+5:302021-01-01T04:02:01+5:30
हार्टफुलनेस संस्थेतर्फे व्हर्च्युअल उपक्रमाला सुरुवात औरंगाबाद : नवीन आशा आणि परिवर्तनाचे युग अशा दृष्टीने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी ...

हार्टफुलनेस संस्थेतर्फे व्हर्च्युअल उपक्रमाला सुरुवात
हार्टफुलनेस संस्थेतर्फे व्हर्च्युअल उपक्रमाला सुरुवात
औरंगाबाद : नवीन आशा आणि परिवर्तनाचे युग अशा दृष्टीने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हार्टफुलनेस संस्थेच्या वतीने ३१ डिसेंबरपासून ते २ जानेवारी दरम्यान व्हर्च्युअल उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्था १३० देशात ध्यान-धारणा, योगाचा प्रचार-प्रसार करीत आहे. २०२१ च्या प्रारंभी, पुनर्रचना, पुनरुत्साह, हृदयाशी पुनर्भेट या कार्यक्रमाने लोकांमध्ये स्फूर्ती भरण्याचा हार्टफुलनेसचा मानस आहे. यासाठी तीन दिवशीय व्हर्च्युअल उपक्रम घेण्यात येत आहे. हार्टफुलनेसचे मार्गदर्शक दाजी, जे योगशिक्षक बाबा रामदेव, भगिनी बी. के. शिवानी आणि गौर गोपाल दास हे लोकांसोबत संवाद साधणार आहे. या उपक्रमाचे सूत्रसंचालन दिग्दर्शक शेखर कपूर करतील. व्हर्च्युअल उपक्रम http://heartfulness.org/refresh2021 येथे आणि हार्टफुलनेस यूट्यूब चॅनेल http://hfn.link/refresh2021 वर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता प्रत्यक्षात पाहता येणार आहे. ३१ डिसेंबर रोजी ध्यान आणि योगाच्या सरावाने लवचिकता कशी वाढवायची याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. १ जानेवारी २०२१ रोजी पुनरुज्जीवनासाठी भूतकाळाला मागे सोडून देण्याचे महत्त्व यावर माहिती आणि २ रोजी आंतरिक संधानाद्वारे रूपांतर घडवून आणण्यास मदत करणे यावर मार्गदशक सर्वांशी संवाद साधणार आहेत. या व्हर्च्युअल उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हार्टफुलनेस संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
हे योगाचे आधुनिक रूप आहेत, यांची रचना समाधान, आंतरिक शांती आणि स्थिरता, अनुकंपा, धैर्य आणि विचारांची स्पष्टता येण्यासाठी करण्यात आली आहे. हार्टफुलनेस साधनेचे प्रशिक्षण हजारो शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरू आहे आणि जगभरात १,००,००० व्यावसायिक त्यांच्या संस्थांमध्ये, अशासकीय आणि शासकीय संस्थांमध्ये ध्यान करीत आहेत. ५००० हून अधिक हार्टफुलनेस केंद्रे १३० देशांमधील हजारो प्रमाणित स्वयंसेवी प्रशिक्षकांच्या मदतीने सुरू आहेत.