शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

श्री योगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: November 29, 2014 00:30 IST

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत होत आहे.

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत होत आहे. शुक्रवारी सकाळी वर्णी महापूजेने मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ झाला. तहसीलदार राहुल पाटील व रेवती पाटील यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. या वर्णी महापूजेने या महोत्सवाची सुरूवात झाली मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदीर परिसरात सलग नऊ दिवस आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. या वर्षी मंदिरात जवळपास ४ हजार महिला बसल्या असल्याची देवल कमिटीच्या वतीने देणयात आली. शुक्रवारी सकाळी झालेल्या महापूजेनंतर महिलांची मंदिरात आराध बसण्यासाठी गर्दी वाढू लागली होती. शहर वासियांनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा केल्या होत्या. या वेळी झालेल्या महापूजेला तहसीलदार राहुल पाटील व रेवती पाटील यांनी विधिवत योगेश्वरी देवीची महापूजा व महाआरती केली. यावेळी देवल कमिटीचे विश्वस्त भगवानराव शिंदे, मुकुंद पुजारी, सारंग पुजारी, यांच्यासह देवीचे मानकरी भक्त उपस्थित होते. पौरोहितांच्या विधीवत महापूजेनंतर महोत्सवास प्रारंभ झाला. महोत्सवाच्या कालावधीत सलग नऊ दिवस विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच आराध बसलेल्या सर्व महिलांच्या निवासाची, पाण्याची व त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी देवल कमिटीच्या वतीने उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. अशी माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार राहुल पाटील यांनी दिली. (वार्ताहर)भाविकांसाठी सार्वजनिक शौचलयाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख उषा यादव यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव हा अंबाजोगाईच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचा उत्सव आहे. यानिमित्ताने अंबाजोगाई शहर तालुक्यातून तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. महिला भाविकांची संख्या अधिक असते. मार्गशीर्ष नवरात्रानिमित्ताने महिला भाविक आराध बसण्यासाठी मंदिरात येतात. ९ दिवस महिला आराध म्हणून बसतात. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेण्यात यावी. मंदिर प्रशासनाने या प्रश्नात लक्ष घालावे व भक्तांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी उषा यादव, प्रशांत शिंदे, अर्जुन जाधव यांनी या निवेदनाव्दारे केली़