शिवसंपर्क मोहिमेचा सिल्लोडमधून शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:04 IST2021-07-15T04:04:46+5:302021-07-15T04:04:46+5:30
शिवसैनिकांनी कोरोनाच्या संकट काळात जे मदतकार्य केले ते उल्लेखनीय आहे. शहर, गाव, वस्तीला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी जनजागृती करून ...

शिवसंपर्क मोहिमेचा सिल्लोडमधून शुभारंभ
शिवसैनिकांनी कोरोनाच्या संकट काळात जे मदतकार्य केले ते उल्लेखनीय आहे. शहर, गाव, वस्तीला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी जनजागृती करून उपाययोजना कराव्यात, सामान्यांना न्याय देणे हीच शिवसेनेची भूमिका असल्याने गावागावात जावून सामान्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी यावेळी केले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक राखी परदेशी, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नगराध्यक्षा राजश्री निकम, केशवराव तायडे, डॉ. मच्छिंद्र पाखरे, उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देवीदास लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, गटनेते नंदकिशोर सहारे, युवासेना शहरप्रमुख शिवा टोम्पे, राजेंद्र ठोंबरे, सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे आदी उपस्थित होते.
---- फोटो :
140721\img-20210711-wa0375.jpg
कॅप्शन..
सिल्लोड येथे शिवसंपर्क मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी सोबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार व पदाधिकारी दिसत आहे