लायन्सच्या ४५ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:24+5:302020-12-17T04:27:24+5:30

तपासलेल्या पैकी ३५ रुग्णांवर १४ ते ३० डिसेंबर या कालावधीत दहिफळे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येतील. या शिबिरासाठी औरंगाबाद ...

Launch of Lions' 45th Free Plastic Surgery Camp | लायन्सच्या ४५ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरास प्रारंभ

लायन्सच्या ४५ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरास प्रारंभ

तपासलेल्या पैकी ३५ रुग्णांवर १४ ते ३० डिसेंबर या कालावधीत दहिफळे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येतील.

या शिबिरासाठी औरंगाबाद ड्रगीस्ट व केमिस्ट असोसिएशनतर्फे मोफत औषधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या शिबिराच्या यशस्वीतेकरिता लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. संजीव गुप्ता, सचिव विनोद चौधरी, माजी अध्यक्ष राजेश भारूक, जी. एम. बोथरा, प्रकाश गोठी, राजेश लहुरीकर, गजानन झालवार आदी प्रयत्नशील आहेत. उर्वरीत लायन्स सदस्य व्हिडीओ कॉनफ्रन्सद्वारे सहभागी झाले होते. लियो सदस्य गौरवी भारूका व प्रीती झालवार यांनी सूत्रसंचलन केले. याप्रसंगी लायन दीपा भारूका व मोहन हिप्पलनेरकर यांनी नोंदणी केली. लायन्स हॉस्पिटलचे प्रीतेश सोनार, सुधाकर पवार आणि कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली.

औरंगाबाद इंडस्ट्रियल कॉट्रॅक्टर असोसिएशनतर्फे लायन्स आई हॉस्पिटलसाठी ऑटोमेटिक सनिटाईजर मशीन भेट दिले. अध्यक्ष मारुती फुलारी, गजानन देशमुख, अनिल न्यायाधीश, प्रवीण अमृतकर यांची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Launch of Lions' 45th Free Plastic Surgery Camp