सिल्लोडमध्ये ‘डॉक्टर आपल्या दारी’ अभियानाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:05 IST2021-04-10T04:05:36+5:302021-04-10T04:05:36+5:30
शहरातील प्रत्येक वॉर्डातील नागरिकांची तपासणी पूर्ण होईपर्यंत हे अभियान सुरूच राहणार आहे. शुक्रवारी दिवसभर राबविण्यात आलेल्या अभियानास शहरातील नागरिकांनी ...

सिल्लोडमध्ये ‘डॉक्टर आपल्या दारी’ अभियानाला सुरुवात
शहरातील प्रत्येक वॉर्डातील नागरिकांची तपासणी पूर्ण होईपर्यंत हे अभियान सुरूच राहणार आहे. शुक्रवारी दिवसभर राबविण्यात आलेल्या अभियानास शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. आरोग्य तपासणी सुरू असताना कोणीही गर्दी करू नये, डॉक्टर आपल्या घरी येईपर्यंत कोणीही घराबाहेर येऊ नये, घरी राहा सुरक्षित राहा व ‘डॉक्टर आपल्या दारी’ अभियानात येणाऱ्या डॉक्टर व पथकातील सदस्यांना सहकार्य करा, असे आवाहन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले. या अभियानप्रसंगी नगराध्यक्ष राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह तहसीलदार विक्रम राजपूत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे, डॉ. संजय जामकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, नगरसेविका कल्याणी गौर, राजू गौर यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
फोटो :
सिल्लोड शहरात डॉक्टर आपल्या दारी अभियानाद्वारे रुग्णांची तपासणी करताना आरोग्य पथक. सोबत नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर आदी.