दरोड्यामुळे लातूरचा सराफा बाजार हादरला !
By Admin | Updated: December 9, 2015 23:55 IST2015-12-09T23:47:48+5:302015-12-09T23:55:14+5:30
राजकुमार जोंधळे , लातूर साखरा पाटी येथील एका पेट्रोलपंपातील कॅश रुममध्ये विश्रांती घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना तुफान हाणामारी करून रोख रक्कम लुटल्याची घटना ताजी असतानाच

दरोड्यामुळे लातूरचा सराफा बाजार हादरला !
राजकुमार जोंधळे , लातूर
साखरा पाटी येथील एका पेट्रोलपंपातील कॅश रुममध्ये विश्रांती घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना तुफान हाणामारी करून रोख रक्कम लुटल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री लातूरच्या सराफा बाजारातील एका कारागिराच्या दुकानात दरोडा पडला. हा दरोडा जिल्ह्यातील सर्वात मोठा दरोडा असून, दरोडेखोरांनी दीड किलो सोने लुटले आहे. यामुळे सराफा बाजार हादरला असून, भीतीचे सावट पसरले आहे. सराफा बाजारातील सार्वजनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याने दरोडेखोरांना कैद केले असले तरी त्यांची ओळख पटणे मुश्किलीचे झाले आहे. शिवाय, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे मंगळवारी बंद होते. त्यामुळे दरोडेखोरांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान राहणार आहे. लातूर जिल्ह्यात रेणापूर ते आष्टामोड, किनगाव ते कोपरा, खरोळा शिवार, वासनगाव परिसर, औसा तालुक्यातील आशिव येथील एका बारवर आणि लातूर शहरातील मंत्री नगर, औसा रोड परिसर, साई रोड परिसर आदी ठिकाणी दरोडा पडल्याच्या घटना गतवर्षभरात घडलेल्या आहेत. या दरोड्याची तीव्रता तितकीशी चर्चेत नव्हती. परंतु, साखरा पाटी येथे एका पेट्रोलपंपावर गेल्या जुलै महिन्यात दरोडा पडला होता.
ऐन दिवाळीत साईरोड परिसरात मोठी घरफोडी झाली होती. तब्बल २८ तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी घर फोडून लंपास केले. चोरीचा गुन्हा दाखल झाला. परंतु, अद्याप चोरट्यांचा शोध पोलिसांना लागलेला नाही. साखरा पाटी पेट्रोलपंपावरील अपवाद वगळता अनेक मोठ-मोठ्या चोरीच्या घटनांतील तपास लागला नाही. आता मंगळवारी झालेल्या दरोड्याबाबत तपासात किती गती येईल, हे येणाऱ्या काळात दिसेल. परंतु, सध्या लातूरच्या सराफा बाजारातील व्यापारी कमालीचे धास्तावले आहेत.
४जून ते सप्टेंबर या काळात चोरट्यांकडून धाडसी दरोडे, घरफोड्या आणि जबरी चोरीच्या घटना घडल्या. जूनमध्ये १९ घरफोड्या, ६४ विविध चोरीच्या घटना, जुलै १८ घरफोड्या तर ४६ विविध चोरीच्या घटना आणि आॅगस्ट १८ घरफोड्या तर ६० विविध चोरीच्या घटना घडल्या असून, तीन महिन्यात घरफोडीच्या एकूण घटना या ५५ घरफोडी तर चोरीच्या १७० घटनांची नोंद आहे. तीन महिन्यांत चोरट्यांनी तब्बल ११२ कोटींचा मुद्देमाल लंपास केला आहे. मात्र यातील बहुतांश घटनांतील आरोपींचा शोध पोलिसांना लागला नाही.
जिल्ह्यातील रेणापूर, किनगाव आणि उदगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वाटमारीच्या घटनेतील दरोडेखोराकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ रिव्हॉल्वर आणि १८ जिवंत काडतुसे जप्त केले होते.
४किनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटोदा, रेणापूर तालुक्यातील खरोळा आणि उदगीर तालुक्यात दरोडेखोरांनी दोन महिन्यापूर्वी दरोडे टाकत लुटालुट केली होती़ या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना पकडले. त्यांच्याकडून १ देशीमेड व ४ जिवंत काडतुसे जप्त केली होती. जुन्या घटनांतील दरोडेखोरांची हिस्ट्री तपासली जाणार आहे.