लातूर मनपाने सुरू केले अँड्राईड अॅप
By Admin | Updated: December 25, 2016 23:46 IST2016-12-25T23:43:36+5:302016-12-25T23:46:42+5:30
लातूर : लातूर मनपाने विविध नागरी समस्यांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी अँड्राईड अॅप विकसित केले आहे़

लातूर मनपाने सुरू केले अँड्राईड अॅप
लातूर : लातूर मनपाने विविध नागरी समस्यांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी अँड्राईड अॅप विकसित केले आहे़ गुगल प्ले स्टोअरमधून अॅप उपलब्ध असून, ेू’ं३४१ या नावाने डाऊनलोड करता येणार आहे़
विविध नागरी समस्या, स्वच्छता, पथदिवे, पाणीपुरवठा, अनाधिकृत बांधकाम आदी संदर्भात तक्रार या अॅपद्वारे नोंदविता येणार आहे़ तक्रारीचा फोटो काढून अपलोड करण्याची यात विशेष सोय आहे़ शहरातील अनाधिकृत बॅनर, होर्डिंग्स यांच्या फोटोसह तक्रार नोंदविता येईल़ तक्रारीची सद्य:स्थिती जाणून घेणे, नागरी सुविधा केंद्रातून मिळणारे विविध दाखले, परवाने याकरिता आवश्यक अर्जांचे नमुने डाऊनलोड करिता उपलब्ध आहेत़ नगरसेवकांचे संपर्क क्रमांक, महापालिकेतील विविध समिती प्रमुखांचे मोबाईल नंबर, महापालिका प्रशासनाशी संपर्क सुलभ व्हावा, याकरिता भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध केले आहेत़ महापालिकेबाबत अभिप्रायही येथे नोंदविता येणार आहेत़ नवीन रस्ता, नाली बांधकामाकरिता मागणी नोंदविता येणार आहे़ ४८ तासात तक्रारींचा निपटारा न केल्यास तक्रार वरिष्ठांकडे वर्ग होईल़ इतर कामांविषयी सात दिवसात तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारकर्त्याचे समाधान न झाल्यास ही तक्रारही वरिष्ठांकडे वर्ग होईल़
नागरिकांनी अॅपच्या माध्यमातून तक्रार नोंद केल्यानंतर त्या तक्रारीचा विशेष टोकण क्रमांक निर्माण होणार आहे़ या तक्रारीची माहिती प्रशासनाला एसएमएसने प्राप्त होईल़ जेणेकरून तक्रारीची सोडवणूक करणे शक्य होईल़ प्राप्त तक्रारी, केलेली कार्यवाही, प्रलंबित तक्रारी याचा अहवाल कार्यालय प्रमुखांना मिळणार आहे़