लातूर आगाराचा कारभार पहिल्यांदाच महिलेकडे

By Admin | Updated: May 23, 2016 23:48 IST2016-05-23T23:38:50+5:302016-05-23T23:48:58+5:30

लातूर : लातूर आगारातील प्रभारी आगार व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी यांची विभागीय कार्यालयामध्ये सहाय्यक वाहतूक अधिक्षकपदी बदली झाली असून,

Latur is the first woman in charge of the Agra | लातूर आगाराचा कारभार पहिल्यांदाच महिलेकडे

लातूर आगाराचा कारभार पहिल्यांदाच महिलेकडे

लातूर : लातूर आगारातील प्रभारी आगार व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी यांची विभागीय कार्यालयामध्ये सहाय्यक वाहतूक अधिक्षकपदी बदली झाली असून, त्यांच्या जागी औसा येथील धरणी कांडगिरे यांची आगार व्यवस्थापकपदी वर्णी लागली आहे़ आगार स्थापनेपासून पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांची वर्णी लागली असल्याने महिला वाहकांच्या प्रश्नाला न्याय मिळणार आहे़
लातूर आगाराच्या प्रमुखपदाची प्रभारी जबाबदारी बालाजी सूर्यवंशी यांच्यावर होती़ त्यांची विभागीय कार्यालयामध्ये सहाय्यक वाहतूक अधिक्षकपदी नुकतीच बदली झाली आहे़ त्यांच्या जागी औसा येथील धरणी कांडगिरे यांची वर्णी लागली आहे़ त्यांनी यापूर्वी विभागीय कार्यालयामध्ये सहाय्यक यंत्र अभियंता या पदावर काम केले आहे़ तसेच उदगीर व औसा येथेही आगार व्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळला आहे़ त्यांची कार्याची चुनुक पाहून त्यांना लातूर आगार व्यवस्थापक म्हणून संधी मिळाली असून, त्यांनी नुकताच लातूर आगार व्यवस्थापक पदाचा पदभार स्विकारला आहे़ लातूर आगारामध्ये पहिल्यांदाच महिला आगार व्यवस्थापकपदी महिला अधिकाऱ्यांची वर्णी लागल्यामुळे महिला वाहक कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळणार आहे़
लातूर आगाराच्या आगार व्यवस्थापकपदी औसा येथील धरणी कांडगिरे रुजू झाल्या असून, त्यांचा राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे प्रादेशिक सचिव डॉ़बलभीम पाटील यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला़ यावेळी राज्य संघटक सचिव व्यंकट बिराजदार, विभागीय सचिव कमलाकर सोमवंशी, आगार अध्यक्ष एस़आऱमुंडे, सचिव कुमार माने आदींची उपस्थिती होती़

Web Title: Latur is the first woman in charge of the Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.