मुंबईकरांच्या सेवेसाठी लातूरची बससेवा
By Admin | Updated: September 16, 2014 01:32 IST2014-09-16T00:46:53+5:302014-09-16T01:32:18+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर एस.टी.च्या लातूर विभागाने मुंबईकरांना गणपती व गौरी उत्सवासाठी कोकणात जाण्याची सोय केली होती. एकूण ७५ बसेस मुंबईकरांना दिल्या होत्या.

मुंबईकरांच्या सेवेसाठी लातूरची बससेवा
बाळासाहेब जाधव , लातूर
एस.टी.च्या लातूर विभागाने मुंबईकरांना गणपती व गौरी उत्सवासाठी कोकणात जाण्याची सोय केली होती. एकूण ७५ बसेस मुंबईकरांना दिल्या होत्या. यातून लातूर विभागाला १४ दिवसांत १३ लाख ६८ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे़
लातूर विभागाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गणपती व गौरी उत्सवानिमित्त मुंबई येथून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी राज्यभरातून गाड्या मागविल्या जातात़ त्याचधर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशानुसार लातूर विभागातून ७५ बसेसची सोय २४ आॅगस्ट ते १० सप्टेंबर २०१४ या कालावधीसाठी करण्यात आली़ यामध्ये लातूर विभागातून लातूर-१९, उदगीर-१६, अहमदपूर-१४, निलंगा-१३, औसा-१३ अशा एकूण ७५ बसेस देण्यात आल्या. १४ दिवसांच्या कालावधीत लातूर विभागाला १३ लाख ६८ हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले.