शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

आंदोलकांवर सौम्य लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:57 IST

माजलगाव : रस्त्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावरील तालखेड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : रस्त्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावरील तालखेड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकर्त्यांनी केला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.तालुक्यातील तालखेड ते इरला हा १६ कि.मी. अंतर असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वारंवार मागणी करूनही तो दुरूस्त झाला नाही. लोकप्रतिनिधींकडून टाळाटाळ तर प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर बनत गेला. त्यामुळे हाल होत आहेत. माजलगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत तालखेड ते इरला मजरा हा रस्ता येतो. परंतु हा रस्ता गेवराई मतदार संघातील असल्यामुळे सा.बां. उपविभाग माजलगाव या बाबत सदरील रस्ता हा गेवराई विभागाकडे वर्ग केला असल्याचे सांगते.गेवराई सा.बां. उपविभागाकडे रस्त्याबाबत विचारल्यास ते सदरील रस्ता हा आमच्याकडे अजून वर्ग झाला नसल्याचे कारण सांगतात. त्यामुळे या रस्त्याबाबत नेमका कोणाला जाब विचारावा असा संभ्रम झाला होता.राजकीय पुढारी देखील या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देत नाहीत. कारण तालखेड परिसर हा माजलगाव तालुक्यात येतो तर मतदानासाठी गेवराई मतदार संघात येतो. रस्ता खराब झाल्यामुळे विशेष करून विद्यार्थ्यांचे त्यातही मुलींचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या रस्त्यावरून वाहन चालविणे तर दुरच परंतु पायी चालणेही मुश्किल बनते. त्यामुळे हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी तालखेड, खेर्डा, एकदरा, इरला, थेरला, डुबा, तेलगाव, पुंगणी, जामगाव तांडा, येळा तांडा, चाहुर तांडा, वाडी, मारफळा तांडा इ. गावांचे ग्रामस्थ एकत्र आले व रास्ता रोको केला.प्रशासनाकडुन आंदोलनाची बराचवेळ दखल न घेतल्यामुळे आंदोलन लांबले. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.दरम्यान, तहसीलदार एन.जी.झंपलवाड यांना निवेदन सादर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तीन तासानंतर महामार्गावरील वाहतुक सुरळीत झाली. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त होता.