शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लालफितीचा कारभार, २०१४ च्या निवडणुकीचे मानधन पोलिसांना दहा वर्षांनी मिळाले

By सुमित डोळे | Updated: April 8, 2024 16:31 IST

तत्कालीन महासंचालकांसह २,५९३ पोलिसांना ४ कोटी ३० लाख निधी मंजूर

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीच्या कामकाजासाठी पूर्णवेळ नियुक्त शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधन दिले जाते. अन्य विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ते वेळच्या वेळी मिळाले. मात्र, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत कर्तव्य बजावलेल्या पोलिसांच्या मानधनाच्या मंजुरीला अखेर दहा वर्षांनी मुहूर्त लागला आहे. गृह विभागाने तत्कालीन महासंचालकांसह २,५९३ पोलिसांसाठी ४ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे.

निवडणुकीदरम्यान सर्वच शासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागतात. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान तुलनेने पोलिस, महसूल विभागांवर मात्र कामकाज, नियोजनाचा मोठा ताण येतो. त्यामुळे संपूर्ण विभाग यासाठी कामाला लागत असला तरी निवडक अधिकारी, कर्मचारी पूर्णवेळ निवडणुकीच्याच कामकाजासाठी नियुक्त केले जातात. त्यासाठी त्यांना मानधन दिले जाते. सुरुवातीला हा निधी केवळ महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळत होता. मात्र, पोलिस विभागाने मागणी लावून धरल्यानंतर २००४च्या निवडणुकीपासून पोलिसांनाही हा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली. नियमानुसार मूळ वेतन व मासिक भत्त्याची रक्कम मिळून निधी देण्यात येतो.

तत्कालीन महासंचालकांचाही समावेश २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील हाच निधी महसूल विभागाला तत्काळ मंजूर झाला होता. मात्र, पोलिस विभागाकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दबावतंत्रही कामी आले नाही. त्यानंतर २०१९च्यादेखील निवडणुका पार पडल्या. मात्र, गृह विभागाला याचा पूर्णपणे विसर पडला होता. राज्यातील २,५९३ पोलिसांचा ४ कोटी ३० लाख ८ हजार रुपये निधी मंजुरीअभावी प्रलंबित होता. यात तत्कालीन पोलिस महासंचालक संजीव दयाळ, अपर महासंचालक के. एल. बिष्णोई, देवेन भारती यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.

आता एवढ्यांना मिळणार निधी१ पोलिस महासंचालक, ३ अपर महासंचालक, ५ विशेष पोलिस महानिरीक्षक, २ उपमहानिरीक्षक, ६ पोलिस आयुक्त, ४३ पोलिस उपायुक्त, ५५ अपर अधीक्षक, १०० सहायक आयुक्त, ३६१ पोलिस निरीक्षकांसह एकूण २,५९३ पोलिसांच्या या निधीला नुकतीच मंजुरी मिळाली. मानधनाचे वाटप बिनचूक करण्याची जबाबदारी घटकप्रमुखांची असेल, असेही विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वरके यांनी आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४