लासूर स्टेशन ग्रामपंचायत निवडणूक रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:44+5:302020-12-17T04:32:44+5:30
रामेश्वर श्रीखंडे लासूर स्टेशन : ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजताच इच्छुकांकडून गुप्त प्रचाराची चढाओढ सुरू झाली. मात्र जादुची कांडी फिरून ...

लासूर स्टेशन ग्रामपंचायत निवडणूक रंगणार
रामेश्वर श्रीखंडे
लासूर स्टेशन : ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजताच इच्छुकांकडून गुप्त प्रचाराची चढाओढ सुरू झाली. मात्र जादुची कांडी फिरून आमदार पदा पर्यंत मजल मारणार्या आमदार प्रशांत बंब यांचे पुरस्कृत पॅनल व सभापती संपत छाजेड यांच्या पॅनलची युती होणार की नाही? याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. या पॅनलच्या युतीवरच लासूर स्टेशन ग्रामपंचायतीच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.
गंगापूर तालूक्यातील लासूर स्टेशन बाजार पेठेतील सांवगी ग्रुप ग्रामपंचायत मिनी नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. या निवडणूकी कडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. आमदार प्रशांत बंब यांनी सरपंचपद ते जिल्हा परिषद सदस्य ते सभापती पासून ते आमदार पदाची हॅट्रीक मारली. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणूकीत प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली सतरा सदस्यापैकी चवदा सदस्य सावंगी ग्रुप ग्रामपंचायतीत निवडून आले होते. त्याचे वर्चस्व निर्माण केले. तर विरोधकांचे फक्त तीन सदस्य होते. यंदा आता निवडणूकीचे वारे सुरू झाले आहेत. त्यात प्रशांत बंब यांच्यावर नुकत्याच साखर कारखान्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे विरोधक हाच मुद्दा समोर करून ग्रामपंचायत निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. तर सेनेचे संपत छाजेड यांच्यात युती होणार का, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. महाविकास आघाडीमुळे गाव पातळीरील राजकारणात नक्कीच परिमाम जाणवणार हे मात्र सत्य आहे.
स्वतंत्र पॉनलची चर्चा
शिवसेनेचे संपत छाजेड यांना ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीशी सख्य करावे लागणार आहे. असे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले तरी छाजेड मात्र स्वतंत्र पॉनल उभारून निवडणूकीच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा लासूर गावात होत आहे. लासूर स्टेशन सांवगी ग्रुप ग्रामपंचायत निवडणूकीत १४ हजारापेक्षा अधिक मतदान आहे. त्यामुळे निवडणूक माळ नेमकी कोणत्या पक्षाच्या गळ्यात पडणार हे काही दिवसातच कळेल.