अखेर शहागड बंधाऱ्यात सोडले पाणी
By Admin | Updated: July 6, 2014 00:21 IST2014-07-06T00:04:53+5:302014-07-06T00:21:56+5:30
गेवराई: गेवराई शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शहागड बंधाऱ्यातील पाणी तळाला गेले होते. त्यामुळे पाणीप्रश्न निर्माण झाला होता.

अखेर शहागड बंधाऱ्यात सोडले पाणी
गेवराई: गेवराई शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शहागड बंधाऱ्यातील पाणी तळाला गेले होते. त्यामुळे पाणीप्रश्न निर्माण झाला होता. अखेर शुक्रवारी रात्री या बंधाऱ्यात पाणी सोडल्याने गेवराईकरांचा जीव भांड्यात पडला आहे.
गेवराई शहराला गेल्या सहा ते सात वर्षांपासून शहागड बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या महिनाभरात पाऊस न पडल्याने या बंधाऱ्यातील पाणीपातळीने तळ गाठला होता. त्यामुळे गेवराईकरांवर पाणीसंकट ओढावले होते. या बंधाऱ्यात पैठणच्या नाथसागरातून पाणी सोडण्याची मागणी नगराध्यक्ष माया सौंदरमल, मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी जायकवाडी विभागाकडे केली होती. गेवराई शहरासाठी एक पाणी सोडण्याचे राहिले होते. हे विचारात घेता शुक्रवारी नाथसागरातून शहागड बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले.
शहागड येथील बंधाऱ्यात पाणी सोडल्यामुळे गेवराई शहराला आता मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. (वार्ताहर)