अखेर दलित वस्तीचे ३१ कोटी मार्गी
By Admin | Updated: July 23, 2014 00:34 IST2014-07-22T23:53:08+5:302014-07-23T00:34:59+5:30
जालना : दलित वस्तीसाठीचा गेल्या अनेक दिवसांपासून पडून असलेल्या ३१ कोटींचा निधी अखेर ‘लोकमत’ च्या दणक्याने सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषदेने मार्गी लावला आहे.

अखेर दलित वस्तीचे ३१ कोटी मार्गी
जालना : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत दलित वस्तीसाठीचा गेल्या अनेक दिवसांपासून पडून असलेल्या ३१ कोटींचा निधी अखेर ‘लोकमत’ च्या दणक्याने सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषदेने मार्गी लावला आहे.
त्यासाठी सुमारे ६५० ग्रामपंचातीअंतर्गत कामांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आशाताई भुतेकर यांच्या दालनात मंगळवारी तातडीने बैठक घेण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, समाजकल्याण सभापती रुख्मीणीताई राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी. केंद्रे, समाजकल्याण अधिकारी संगीता मकरंद आदींची उपस्थिती होती. ही कामे ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. (प्रतिनिधी)
पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य
कामांचे नियोजन करताना दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर रस्ते आणि समाजमंदिरांची कामांना प्राधान्य देण्यात आले. पाणीपुरवठ्यासाठी ५ लाख, रस्त्यांसाठी ४ ते ५ लाख आणि समाजमंदिरांच्या कामासाठी ७ लाख असे प्रमाण निधी देताना ठरवून देण्यात आले.