शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'..अन् सरणावरील आई जिवंत झाली'; शेवटच्या विधीत पाणी पाजताना अचानक पापणी हलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 12:26 IST

कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील जिजाबाई वाल्मिक गोरे (९०) यांचे सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास निधन झाले होते.

ठळक मुद्देरात्री साडेनऊच्या सुमारास लाकडाने रचलेल्या सरणावर प्रेत ठेवण्यात आले. पाणी पाजण्यासाठी चेहरा फक्त उघडा ठेवण्यात आला होता.

कन्नड ( औरंगाबाद ) : मयत झालेल्या वृद्ध आईला रूढी परंपरेनुसार सर्व विधी पार पाडून तिरडीवर ठेऊन स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे प्रेत सरणावर ठेवल्यानंतर शेवटचा विधी पार पाडणार, तोच अचानक प्रेताची पापणी हलली. त्या पाठोपाठ हाताची हालचाल झाल्याने वृद्धेस सरणावरून काढून तातडीने कन्नडच्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले.

कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील जिजाबाई वाल्मिक गोरे (९०) यांचे सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास निधन झाले होते. नातेवाईक आणि आप्तेष्टांना ही बातमी समाजमाध्यम आणि फोनद्वारे कळविण्यात आली. सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठीही जमले. रूढी परंपरानुसार अंघोळ घालून प्रेत तिरडीवर ठेऊन स्मशानात नेण्यात आले. रात्री साडेनऊच्या सुमारास लाकडाने रचलेल्या सरणावर प्रेत ठेवण्यात आले. प्रेत लाकडांनी झाकण्यात आले. पाणी पाजण्यासाठी चेहरा फक्त उघडा ठेवण्यात आला होता. या दरम्यान, पाणी पाजण्याच्या वेळी जिजाबाईची पापणी हलली. त्या पाठोपाठ हातानेही चालचाल केल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. हे सर्व नातेवाइकांना अचंबित करणारे होते. त्यामुळे नातेवाइकांनी त्या जिजाबाईला सरणावरून तातडीने खाली काढून कन्नडच्या खासगी दवाखान्यात आणण्यात आले. दवाखान्यात जिजाबाईने ङोळे उघडले, हातापायाची हालचाल केली, श्वासोच्छवास व्यवस्थित होता, असे डॉ. मनोज राठोड यांनी सांगितले.

आईला सरणावर ठेवल्यानंतर पाणी पाजताना आईने डोळा उघडला. मी आईच्या तोंडात ठेवलेला विडा काढल्यानंतर तिने घटाघटा पाणी प्यायले. लगेच आईला सरणावरुन काढून कन्नडच्या खाजगी दवाखान्यात आणले. आता आई बोलत असल्याची माहिती त्या म्हातारीचा मुलगा माजी नगरसेवक विलास गोरे यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू