अंतिम महसुली पैसेवारी ४६ टक्के..

By Admin | Updated: December 19, 2015 23:39 IST2015-12-19T23:30:06+5:302015-12-19T23:39:13+5:30

तालुक्यातील अंतिम पैसेवारीचा अहवाल जाहीर झाला असून, तालुक्याची एकूण सरासरी पैसेवारी ही ४६.१ आली आहे. तहसील र्काालय यांनी

Last Revenue Payday 46 percent .. | अंतिम महसुली पैसेवारी ४६ टक्के..

अंतिम महसुली पैसेवारी ४६ टक्के..

तालुक्यातील अंतिम पैसेवारीचा अहवाल जाहीर झाला असून, तालुक्याची एकूण सरासरी पैसेवारी ही ४६.१ आली आहे. तहसील र्काालय यांनी प्रमुख पिकाखालील क्षेत्राचा प्रपत्र ब चा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आला आहे. चालू वर्षात खरीप हंगामामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. भौगोलिक ६४ हजार ८१५ लागवड क्षेत्रापैकी ६१ हजार ८४५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र कमी पावसाअभावी वाया गेल्या आहेत. तालुक्यावर दुष्काळी परिस्थिती ओढवली असताना अंतिम पैसेवारी पूर्वी अहवालाची वाट न पाहता शासन या विषयी काही तरी भूमिका जाहीर करेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु तसे काही झाले नाही. तालुक्याचे अर्थचक्र शेती व्यवसायावर अवलंबून आहे. प्रमुख खरिपाच्या पिकापैकी कापूस, मका, उडीद, तूर, सोयाबीन, मूग, खरीप ज्वारी, बाजरी व इतर कडधान्य मधून मिळणारे उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना फटका बसून, हाताला आलेल्या पिकाचा उतारा ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत आला आहे. या वर्षात जून आणि आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसावरच अवलंबून राहावे लागले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी, माहोरा, वरुड बु., कुंभारझरी, जाफराबाद या पाच मंडळांतर्गत जाफराबाद, मेरखेडा, सिपोरा अंभोरा, हनुमंतखेडा, वरखेडा विरो, जवखेडा ठेंग, माहोरा, आसई, येवता, जानेफळ पंडित, बोरगाव बु., वरुड बु., खासगाव, भारज, कोळेगाव, सावरखेडा गोंधन, पासोडी, कुंभारझरी, सावरगाव म्हस्के, पापळ, सातेफळ, हिवरा काबळी, टेंभूर्णी, अकोलादेव, डोणगाव, तपोवन गोंधन, सावंगी, देळेगव्हाण या अठ्ठावीस तलाठी सजाअंतर्गत येणाऱ्या १०१ गावांची सरासरी पैसेवारी ही ४६ टक्क्यांपेक्षा कमी आली आहे. उपरोक्त पैसेवारीचा अंतिम अहवाल तहसीलदार देविदास गाढे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार बी. के. चंडोल, अव्वल कारकून विनोद उगले, संकलन सहाय्यक विलास पाखरे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडून झालेल्या पाहणीच्या प्राप्त अहवालानुसार तयार करुन १४ डिसेंबर रोजी वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे.

Web Title: Last Revenue Payday 46 percent ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.