शेवटच्या दिवशी ३२ जागांसाठी ८९ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:24 IST2017-08-25T00:24:08+5:302017-08-25T00:24:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्हा नियोजन समिती निवडणुकीसाठी गुरूवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ३२ जागांसाठी ८९ ...

शेवटच्या दिवशी ३२ जागांसाठी ८९ अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा नियोजन समिती निवडणुकीसाठी गुरूवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ३२ जागांसाठी ८९ अर्ज दाखल झाले आहेत. ११ ते १२ केंद्रांवर मतदान होणार आहे.
जिल्हा नियोजन समितीसाठी सप्टेंबरमध्ये मतदान होणार आहे. शेवटच्या दिवशी ८५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर यापूर्वीच चार अर्ज दाखल होते. ग्रामीण निर्वाचन क्षेत्र २५ जागांसाठी ५०, लहान नागरी क्षेत्र ६ जागांसाठी ३१ तर संक्रमण क्षेत्राच्या १ जागेसाठी ८ अर्ज दाखल झाले आहेत.