विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या
By Admin | Updated: September 13, 2014 23:04 IST2014-09-13T23:00:31+5:302014-09-13T23:04:26+5:30
हिंगोली : शहरालगतच्या लिंबाळा मक्ता येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात सलग दोन दिवस अळ्या निघाल्याची घटना समोर आली आहे.

विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या
हिंगोली : शहरालगतच्या लिंबाळा मक्ता येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात सलग दोन दिवस अळ्या निघाल्याची घटना समोर आली आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची पालकांची मागणी आहे.
येथील वसतिगृहात १५० मुले आणि ५० मुली राहतात. प्रत्येकी ११०० रूपयांचे मासिक शुल्क जेवणासाठी आकारले जाते. मेनुप्रमाणे भाजी, पोळी, वरण, भात, लोणचे पापड, कांदा आणि रविवारी गोड जेवण देणे अनिवार्य आहे. सकाळी ९.३० ते ११ आणि सायंकाळी ५.३० ते ७.३० वेळ असते. ११ सप्टेंबर रोजी रात्रीच्या जेवणात अळ्या निघाल्याची बाब समोर आली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी हा प्रकार वसतिगृहप्रमुखांच्या निदर्शनास आणून दिला. तेव्हा दुसऱ्यांदा स्वयंपाक केला. दुसऱ्या दिवशीही हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.