जालना तालुक्यात सर्वात जास्त शेततळी

By Admin | Updated: July 14, 2016 00:52 IST2016-07-14T00:15:49+5:302016-07-14T00:52:25+5:30

जालना : जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत ३९८ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

The largest peasant in Jalna taluka | जालना तालुक्यात सर्वात जास्त शेततळी

जालना तालुक्यात सर्वात जास्त शेततळी



जालना : जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत ३९८ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी १ कोटी ३४ लाख ८१ हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जालना तालुक्यात सर्वात जास्त १५५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
बदलते हवामान व पावसाच्या अवकृपेमुळे बहुतांश शेतकरी शेततळे करण्यावर भर देत आहेत.त्या अनुषंगानेच शासनाने मागेल त्याला शेततळ तळे ही योजना लागू केली. प्रत्यक्षात मागेल त्या शेततकऱ्याला शेततळे असले तरी जिल्ह्यात १७०६ शेतकऱ्यांनाच शेततळे मिळणार होते. कृषी विभागाने यात वाढ करून १८०८ शेततळ्यांना मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे सर्वच शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्याला साधारणपणे २१४ शेततळ्यांचा लक्षांक्ष देण्यात आला आहे. त्यानुसार निधीचेही वितरण करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी कामे सुरू करावीत, अनुदान तात्काळ देण्यात येणार असल्याचे कृषी अधीक्षक तांभाळे यांनी सांगितले.
जिल्ह्यात १५३ कामे सुरू आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शेततळ्यांची कामे गतीने होत आहेत.
ती येत्या काही दिवसांत पूर्ण होतील असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला. उन्हाळ्यात शेततळ्यांचा कामांना ब्रेक लागला होता. जलयुक्तच्या कामांमुळे पोकलेन व जेसीबी मशीन मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कामे उशिराने करावी लागली.
आता या कामांत गती आली आहे. जिल्ह्यात ३० बाय ३० व तीन फुट खोलीची शेततळे तयार करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
दुष्काळाने होरपळलेल्या जालना जिल्ह्यात जालना तालुक्याने आघाडी घेतली. १२० शेततळी पूर्ण झाली आहेत. एकूण १५३ शेततळ्यांना मंजुरी आहे. यात फळ बागायतदारांनी तात्काळ उपाययोजना करून शेततळी पूर्ण केली. १२० शेततळ्यांसाठी ५९ लक्ष रूपयांचे अनुदान देण्यात आले.

Web Title: The largest peasant in Jalna taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.