पोलीस आयुक्तालयात मोेठे फेरबदल

By Admin | Updated: June 2, 2015 00:29 IST2015-06-02T00:29:52+5:302015-06-02T00:29:52+5:30

औरंगाबाद : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्तालया अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध पोलीस ठाणे, विशेष शाखा, नियंत्रण कक्ष,

Large shuffling of Police Commissioner | पोलीस आयुक्तालयात मोेठे फेरबदल

पोलीस आयुक्तालयात मोेठे फेरबदल


औरंगाबाद : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्तालया अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध पोलीस ठाणे, विशेष शाखा, नियंत्रण कक्ष, महानगरपालिका विशेष पथक आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या १८ पोलीस निरीक्षकांच्या रविवारी रात्री बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमुळे आयुक्तांनी मोठे फेरबदल केले आहेत. बदल्या झालेले अधिकारी नव्या ठिकाणी रुजूही झाले आहेत. त्यांच्या कामाच्या अहवालाच्या आधारेच त्यांचा कार्यकाळ ठरणार आहे. या बदल्या पुढीलप्रमाणे आहेत. कंसात नवीन ठिकाण.
विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात (एमआयडीसी वाळूज ठाणे), एमआयडीसी वाळूज ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे (हायकोर्ट सुरक्षा), नियंत्रण कक्षातील प्रेमसागर चंद्रमोरे (दौलताबाद पोलीस ठाणे), सुरक्षा शाखेचे हेमंत कदम (सिडको वाहतूक शाखा), जिन्सी ठाण्यातील दुय्यम निरीक्षक अशोक मुदिराज (वाहतूक शाखा), एमआयडीसी सिडको ठाणे येथे कार्यरत निर्मला परदेशी (महिला साह्य कक्ष), दौलताबाद ठाण्यातील धनंजय येरुळे ( वाळूज पोलीस ठाणे).
उस्मानपुरा ठाण्याचे भारत काकडे (विशेष शाखा), बेगमपुरा ठाण्याचे श्रीपाद परोपकारी (एमआयडीसी सिडको), सिटीचौक ठाण्यातील नाथा जाधव (मुकुंदवाडी), नियंत्रण कक्षातील वसीम हाशमी (मनपा अतिक्रमण हटाव पथक), अर्ज चौकशी कक्षातील प्रकाश पवार (मुकुंदवाडी ठाण्यात दुय्यम निरीक्षक), महिला साह्य कक्षातील सरोजिनी कदम (अर्ज चौकशी कक्ष), हायकोर्ट सुरक्षा विभागातील बिंदुसार शिंदे (नियंत्रण कक्ष), छावणी ठाण्याचे गौतम फसले (नियंत्रण कक्ष), वाळूज ठाण्यातील अशोक कदम (नियंत्रण कक्ष), मनपा अतिक्रमण हटाव पथकातील सुनील तेलुरे (नियंत्रण कक्ष).

Web Title: Large shuffling of Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.