शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठ्यांना प्रतीक्षा मोठ्या पावसाची

By admin | Updated: August 18, 2015 00:50 IST

जालना : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला तरी जलसाठ्यांसाठी हा पाऊस पुरेसा नाही. १३ आॅगट अखेर एक मध्यम तर १३ लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत.

जालना : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला तरी जलसाठ्यांसाठी हा पाऊस पुरेसा नाही. १३ आॅगट अखेर एक मध्यम तर १३ लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत. दोन्ही प्रकल्प मिळून फक्त ५ टक्के पाणीसाठा असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.पावसाने दडी मारल्याने विहिरी, कूपनलिकांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारे तलाव कोरडेठाक आहेत. तर काहींमध्ये अत्यल्प पाणी आहे. आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसत आहेत. आज अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती तीव्र होत आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी कल्याण गिरजा प्रकल्पात ४८ टक्के जलसाठा आहे. कल्याण मध्यम प्रकल्पातील साठा जोत्याच्या पातळीखाली आहे. अप्पर दुधना प्रकल्प जोत्याखाली, भोकरदन तालुक्यासाठी वरदान असलेला जुई मध्यम प्रकल्पात ११ टक्के साठा आहे. तर धामणा मध्यम प्रकल्पात गत आठवड्यांच्या पावसाने पाच टक्के साठा झाला. गत आठवड्यात हा प्रकल्प जोत्याखाली होता. जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात २५ टक्के पाणीसाठा झाला . गत आठवड्यात फक्त १.४० टक्के पाणी होते.गल्हाटी मध्यम प्रकल्प अद्यापही कोरडाच आहे. मध्यमसोबतच लघु प्रकल्पही ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण आहेत. ५७ पैकी १२ कोरडे तर ३३ प्रकल्प जोत्याच्या खाली आहेत. गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे काहीअंशी साठ्यात वाढ झाली आहे.जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयातील पाणी पातळी वाढ झालेली नाही. परिणामी आगामी काळात जालनावासीयांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे. हे जलाशय भरण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. इतर मध्यम प्रकल्पातही जलसाठ्याअभावी पशुधनाचे हाल होत आहे.