नुकसान मोठे; पंचनामे खोटे !

By Admin | Updated: April 17, 2015 00:43 IST2015-04-17T00:21:00+5:302015-04-17T00:43:51+5:30

व्यंकटेश वैष्णव, बीड आठवड्या पासून जिल्ह्यात आवकाळी पाऊस ठान मांडून बसला आहे. वादळ अन् गारपिटीच्या तडाख्यात फळबागा अक्षरश: उध्वस्त झाल्या आहेत.

Large losses; Panchnema lies! | नुकसान मोठे; पंचनामे खोटे !

नुकसान मोठे; पंचनामे खोटे !


व्यंकटेश वैष्णव, बीड
आठवड्या पासून जिल्ह्यात आवकाळी पाऊस ठान मांडून बसला आहे. वादळ अन् गारपिटीच्या तडाख्यात फळबागा अक्षरश: उध्वस्त झाल्या आहेत. शासन दरबारी आवकाळीने नुकसान झालेल्या पिकांची नोंद केवळ १ हजार ७०० हेक्टर एवढीच आहे. प्रत्यक्ष नुकसान व शासनाकडील आकडेवारी यात मोठी गल्लत होत आहे. नुकसान मोठे मात्र पंचनामे खोटे केले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
जिल्ह्यात एकूण फळबागाचे क्षेत्र १३ हजार ७०० हेक्टर च्या जवळपास आहे. यामध्ये फळधारणा केलेल्या अंब्याच्या बागा ४ हजार हेक्टरवर आहे. याशिवाय पपई, चिकू, मोसंबी याच्या देखील बागा आहेत. एकूण फळबागांचे क्षेत्र लक्षात घेतले तर आज पर्यंत केवळ १ हजार ७०९ हेक्टर एवढेच नुकसान झालेले असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. बुधवारी शासनाने पन्नास टक्के वरून ३३ टक्के नुकसानीलाही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
तलाठी एक गाव अनेक
बीड जिल्ह्यात एकूण ३८० तलाठी सज्जे असून तलाठी संख्या २९५ आहे. ८५ सज्जे रिक्त आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांना गारपीटीचा तडाखा बसलेला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची जबाबदारी तलाठ्यांकडे देण्यात आली आहे. मात्र एका तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा कारभार असल्याने पंचनामे करण्याच्या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Large losses; Panchnema lies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.