शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीवरील जलप्रकल्पातून मोठ्याप्रमाणात विसर्ग; जिल्ह्यातील ३५ गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 11:41 IST

तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.

औरंगाबाद : जायकवाडीवरील जलप्रकल्पातून सध्या ८० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग चालू आहे. गंगापूर, वैजापूर या दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या ३५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. यंदाच्या पावसाळ्यात नदीला पहिल्यांदाच पूरसदृश्य परिस्थती निर्माण झाली असून, जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी ४० टक्के झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली असून, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तहसील कार्यालयाकडून आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेत आहेत.

नाशिकच्या पुराचे पाणी दाखल झाल्याने गेल्या २४ तासात जायकवाडीच्या पाणीपातळीत पाऊन फुटाने वाढ झाली असून ५६.१९ दलघमी ( २ टीएमसी) पाण्याची भर पडली आहे. मंगळवारी रात्री धरणात ४५९३८ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू होती. वरच्या धरणातील विसर्ग लक्षात घेता आवक वाढणार असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. दरम्यान धरणाचा जलसाठा मंगळवारी सायंकाळी ४०%  पेक्षा जास्त झाला होता.

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी सोमवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले. जायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टी सुरू असून तेथील धरणातून गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू आहेत. दरम्यान, जायकवाडी धरणात मंगळवारी सकाळपासून  आवक वाढत असल्याचे दिसून आले सायंकाळी ७ वाजेस धरणात ४५९३८ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील धरण समुहापैकी दारणा धरणातून १५०८८ क्युसेक्स, कडवा धरणातून ३५१७ क्युसेक्स, गंगापूर धरणातून १००३५ क्युसेक्स असा मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत होता.  या सर्व धरणातील पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात येते. तेथून गोदावरी पात्रात ७८२७६ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने गोदावरी पात्रात मंगळवारी विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरी नदीला पुर आला आहे. प्रशासनाने नाशिक ते गंगापूर पर्यंत गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी