वाळूजमहानगरात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:11 PM2019-07-27T23:11:28+5:302019-07-27T23:12:01+5:30

वाळूजमहानगर परिसरात गळकी जलवाहिनी व व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे.

Large amount of water wastes in the sand dunes | वाळूजमहानगरात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी

वाळूजमहानगरात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात गळकी जलवाहिनी व व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. पाणी भरण्यासाठी काही उपद्रवींकडून या भागातील जलवाहिनी व व्हॉल्वही फोडले जात असल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. याकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जलवाहिनीची गळती थांबवून होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.


वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कारखाने, स्थानिक ग्रामपंचायती व सिडको प्रशासनाला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे तसेच जायकवाडी जलाशयातही अपेक्षित जलसाठा न झाल्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने उन्हाळ्यात औद्योगिक क्षेत्र व नागरी वसाहतीत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात कपात झालेली आहे.

यामुळे वाळूजमहानगर परिसरात सर्वत्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना टँकर अथवा जारचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागली होती. आता पावसाळा सुरु होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे परिसरातील जलसाठे तसेच सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत. या शिवाय जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातही पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जायकवाडी धरणात अत्यल्प जलसाठा आहे. पुढील काही दिवसात चांगला पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे. वाळूजमहानगर परिसरात सर्वत्र पाणी टंचाईचे संकट असतांना एमआयडीसी व सिडकोच्या जलवाहिनीतून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे.
व्हॉल्व्ह व जलवाहिनीतून गळती
बजाजगेट-वाल्मीरोडवरील पाटोदाजवळ एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती लागलेली आहे. कामगार चौकालगतही एमआयडीसीच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात गळती सुरु आहे.

या गळक्या जलवाहिनीवर पाणी भरण्यासाठी लगतच्या वसाहतीतील नागरिक तसेच कामगार चौकातील वाहनधारक, हॉटेल व इतर व्यवसायिक गर्दी करतात. ए.एस.क्लब चौकातील व्हॉल्वहमधून पाणी वाहून जात आहे. याच बरोबर सिडकोच्या जलकुंभाकडे जाणाºया जलवाहिनीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे.

या विषयी एमआयडीसीची उपअभियंता प्रशांत सरग म्हणाले की, पाटोदा रोडवरील गळक्या जलवाहिनीची दुरुस्ती केली असून, उर्वरित ठिकाणीही दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

Web Title: Large amount of water wastes in the sand dunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.