मागासवर्गीय मुलांना लॅपटॉप
By Admin | Updated: July 7, 2016 23:32 IST2016-07-07T23:30:23+5:302016-07-07T23:32:29+5:30
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या समितीने यंदा सेस निधीतून मागासवर्गीयांच्या २0१५-१६ मध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागासवर्गीय मुलांना लॅपटॉप
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या समितीने यंदा सेस निधीतून मागासवर्गीयांच्या २0१५-१६ मध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३0 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
जि.प.ने यंदा वैयक्तिक लाभाच्या त्याच त्या पारंपरिक योजनांना छेद देण्यासाठी मागील काही बैठकांत विविध पर्यायांवर विचारविनिमय चालविला होता. पीठ गिरणी, टीनपत्रे, कडबा कटर, शिलाई मशीन आदी पारंपरिक वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्येच हा विभाग गुरफटून पडला. शिवाय याचा आता अनेकांना लाभ मिळाल्याने लाभार्थीही त्या संख्येने पुढे येत नाहीत. तर दुसऱ्यांदा लाभ मिळण्याची भीती लक्षात घेता योजनांचे स्वरुपच बदलले आहे.
यामध्ये जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून यावर्षी २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यास लॅपटॉप देण्याचा निर्णय समितीत घेण्यात आला. यासाठी ३0 लाखांची तरतूद ठेवली. पूर्वी ती २0 लाखच होती. मात्र सदस्यांनी ती वाढवून घेतली. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यावसायिकदृष्ट्याही हे लॅपटॉप उपयोगी पडू शकते. यात दर्जेदार व नामांकित कंपनीचेच लॅपटॉप असावे, असा सदस्यांनी आग्रह धरला. यात जेमतेम ७0 ते ८0 जणांना लाभ मिळू शकणार आहे. या बैठकीस सभापती सहेल्याबाई भोकरे, सदस्य कुंताबाई कऱ्हाळे, पंचफुला सावंत, संजय दराडे, मंगला कांबळे, गयबाराव नाईक, छबुबाई करवंदे, चंद्रकांत हराळ, शारदा केशव नाईक, समाजकल्याण अधिकारी ए.बी. कुंभारगावे, शुक्ला आदी हजर होते . (जिल्हा प्रतिनिधी)