चोरीस गेलेला लॅपटॉप अडीच वर्षानंतर जप्त

By Admin | Updated: July 20, 2014 00:30 IST2014-07-20T00:11:36+5:302014-07-20T00:30:13+5:30

जालना : येथील एका दवाखान्यातून पळविलेला लॅपटॉप विशेष कृती दलाच्या पथकाने आरोपीच्या ताब्यातून जप्त केला.

Laptop stolen after two and a half years | चोरीस गेलेला लॅपटॉप अडीच वर्षानंतर जप्त

चोरीस गेलेला लॅपटॉप अडीच वर्षानंतर जप्त

जालना : येथील एका दवाखान्यातून पळविलेला लॅपटॉप विशेष कृती दलाच्या पथकाने आरोपीच्या ताब्यातून जप्त केला. जानेवारी २०१२ मध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून कामावर असताना ही चोरी केली होती. त्यानंतर आरोपी गायब झाला होता.
पथकात सहायक निरीक्षक विनोद इज्जपवार, जमादार एम.बी. स्कॉट, विनायक कोकणे, संजय गवई, कैलास शर्मा, विनोद गडदे, मारूती शिवरकर, सुनील म्हस्के, फुलचंद हजारे, कृष्णा देठे, संदीप चिंचोले चालक नजीर पटेल आदींचा समावेश होता.
या पथकाला खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार छापा मारण्यात आला. डॉ. बंग यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गत दोन वर्षांपासून तपास करूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. एका खबऱ्याने विशेष कृती दलाला लॅपटॉपची माहिती दिली. यात आरोपी नरेंद्र उत्तमसिंग राजपूत या भोकरदन येथे राहणाऱ्या इसमाला पकडण्यात आले.
त्याच्यावर भोेकरदन येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल असून तो जालना येथे आल्यानंतर डोळ्यांच्या दवाखान्यात सेक्युरिटी गार्ड म्हणून कामावर होता. या दरम्यान त्याने दवाखान्यातून लॅपटॉप चोरला होता.
या लॅपटॉपमधून काहीच डाटा करप्ट केला नाही. छंद म्हणून ही चोरी केली होती. मात्र चोरीनंतर ही नोकरी सोडून दिली होती. विशेष पथकाला खबऱ्याने ही माहिती पुरविल्यानंतर छापा मारण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Laptop stolen after two and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.