शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे जमीन रिचार्ज, टँकरचा खर्च वाचणार; भूजल पातळीत सव्वा मीटरने वाढ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:31 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या एकूण पावसापेक्षा यंदा १३४ टक्के पाऊस पडला आहे.

छत्रपती संभाजीनगर : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत सातत्याने भूजल पातळीची नोंद घेतली जाते. यंदा सतत अतिवृष्टीमुळे बहुतांश प्रकल्प, विहिरी, बोअरवेल आणि शेततळी पाण्याने भरलेली आहेत. जमिनीतही मोठ्या प्रमाणात पाणी मुरले आहे. यातून जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी सव्वा मीटरने वाढली आहे. पुढील काळात पाण्याची चिंता मिटणार आहे.

यंदा सरासरीच्या १३४ टक्के पाऊसजिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या एकूण पावसापेक्षा यंदा १३४ टक्के पाऊस पडला आहे.

९५ टक्के साठाआपल्या जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात ९५ टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे.

साडेचार फुटांनी वाढ यंदा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार आणि सततच्या पावसामुळे नदी, नाल्यांना अनेकदा पूर आले. शिवाय लहान, मोठी धरणे भरल्याने विहिरीही पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत. यातून भूजलपातळीत सुमारे १.२५ मीटरने वाढ झाली आहे.

तीन वर्षांतील भूजल पातळी२०२३ --- १.५ मीटरने घट२०२४ --- १ मीटर वाढ२०२५ --- १.२५ मीटर वाढ

कशी केली जाते मोजणी?जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील १९७२ पासूनच्या विहिरींची पाणी पातळी मोजून त्या आधारे भूजलपातळीचा सरासरी अंदाज काढण्यात येतो.

टँकरचा खर्च वाचणारयंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विहिरी आणि बोअरवेलला भरपूर पाणी आहे. अनेक विहिरींचे पाणी तर हाताने काढता येते. जलस्त्रोत बळकट झाल्याने यंदा टँकरचा खर्च वाचणार आहे.

टँकरची गरज भासणार नाहीजिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. शिवाय सतत पाऊस पडल्याचा फायदा भूजल पातळी वाढण्यास झाला आहे. पातळीत वाढ झाल्याने रब्बी आणि उन्हाळी पिकांना याचा लाभ होईल. शिवाय ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्याची गरज भासणार नाही.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

कोणत्या तालुक्यात किती पातळी? (तक्ता)तालुका --- भूजल पातळीत वाढ मीटरमध्येछ.संभाजीनगर --- १.१३गंगापूर--- १.१०कन्नड-- १.३६खुलताबाद-१.०९पैठण--१.५५फुलंब्री-१.६५सिल्लोड--१.३१सोयगाव-- १.०१वैजापूर-- १.०७

भूजल पातळीत वाढयंदा पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असल्याने निश्चितच भूजल पातळीमध्येही वाढ झालेली आहे. पुढील थोड्या कालावधीमध्ये अजून पाझर वाढून भूजल पातळीत वाढ दिसून येईल. याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना होईल.- जे. एस. बेडवाल, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा भूजल सर्वेक्षण यंत्रणा अधिकारी.

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Recharge Land, Save Tanker Costs; Groundwater Up!

Web Summary : Heavy rainfall in Chhatrapati Sambhajinagar district has significantly raised the groundwater level by over a meter. This increase, fueled by abundant rains and filled reservoirs, promises to reduce reliance on water tankers, benefiting Rabi and summer crops, and alleviating drinking water scarcity in rural areas.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRainपाऊसWaterपाणी