भूम, परंड्यात जाळपोळ, दगडफेक

By Admin | Updated: January 3, 2016 23:59 IST2016-01-03T23:31:53+5:302016-01-03T23:59:09+5:30

भूम / परंडा : चारा छावणीसाठी विषारी द्रव पिवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी जय हनुमान ग्रुपचे संस्थापक सुरेश कांबळे यांना अटक करण्याची

Land, Burning, Burning | भूम, परंड्यात जाळपोळ, दगडफेक

भूम, परंड्यात जाळपोळ, दगडफेक


भूम / परंडा : चारा छावणीसाठी विषारी द्रव पिवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी जय हनुमान ग्रुपचे संस्थापक सुरेश कांबळे यांना अटक करण्याची प्रक्रिया रविवारी सुरू केली होती़ ही माहिती मिळताच कांबळे यांच्या समर्थकांनी भूममधील गोलाई चौकात जाळपोळ केली़ तर वालवड, आनाळा, परंडा येथे बसवर दगडफेक करण्यात आली़ याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती़
जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी जनावरांसाठी अधिकाधिक चारा छावण्या सुरू कराव्यात, अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा दिला होता़ या इशाऱ्यानुसार कांबळे यांनी ३० डिसेंबर रोजी आंदोलन सुरू केले होते़ मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याने कांबळे यांनी विषारी द्रव प्राषण केले होते़ कांबळे यांना उपचारासाठी तात्काळ बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ कांबळे यांची प्रकृती ठिक झाल्यानंतर भूम पोलिसांनी त्यांना अटक करण्याची प्रक्रिया रविवारी सुरू केली़ याची माहिती मिळताच रविवारी सायंकाळी भूम शहरातील गोलाई चौकात कांबळे समर्थकांनी टायर जाळून जाळपोळ केली़ अचानकच समर्थक आक्रमक झाल्याने शहरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता़ तर रात्रीच्या सुमारास वालवड येथे बार्शी-पाथरूड या बसवर (क्ऱएम़एच़१४- डी़पी़०६८९) दगडफेक करण्यात आली़ जाळपोळ व बसवरील दगडफेक प्रकरणी भूम पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती़
परंडा आगाराच्या उस्मानाबाद- तांदूळवाडी या बसवर (क्ऱएम़एच़२०- १९८) मुगाव येथे दगडफेक करण्यात आली़ तर रोहकल येथून परंड्याकडे येणाऱ्या बसवरही (क्ऱएम़एच़२०- १०९) दगडफेक झाली़ तसेच खानापूर पाटीजवळ परंडा- तांदूळवाडी या कौडगाव मार्गे जाणाऱ्या बसवर (क्ऱएम़एच़२०- ९५७४) वर दगडफेक करण्यात आली़ या तिन्ही ठिकाणी झालेल्या दगडफेकीत बसचे मोठे नुकसान झाले़ या दगडफेकीबाबत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती़

Web Title: Land, Burning, Burning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.