तीन दिवसांपासून ग्रामपंचायतीला कुलूप
By Admin | Updated: July 21, 2016 01:09 IST2016-07-21T00:57:06+5:302016-07-21T01:09:05+5:30
मस्सा (खं.) : रस्ते, नाल्यांसह आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरल्याचे सांगत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी १७ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आहेत.

तीन दिवसांपासून ग्रामपंचायतीला कुलूप
मस्सा (खं.) : रस्ते, नाल्यांसह आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरल्याचे सांगत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी १७ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आहेत. तीन दिवसांचा कालावधी लोटूनही ना वरिष्ठ अधिकारी फिरकले ना ग्रामसेवक. त्यामुळे बुधवारीही ग्रामपंचायत कुलूपबंदच होती.
कळंब तालुक्यातील मस्सा खंडेश्वारी गावातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अशीच अवस्था नाल्यांचीही आहे. ग्रामपंचायतीकडून नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाणीपुरवठ्याची परिस्थितीही काही समाधानकारक नाही. उपरोकत प्रश्नांची सोडवणूक करण्यात ग्रामपंचायत सफशेल अपयशी ठरल्याचे सांगत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी १७ जुलै रोजी चक्क ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. या आंदोलनानंतर किमान ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी अथवा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी गावात जावून ग्रामपंचायत कार्यालय उघडणे अपेक्षित होते. पंरतु, तसे झाले नाही. तीन दिवसांचा कालावधी लोटूनही ग्रामपंचायत कार्यालयाकडे ना पदाधिकारी फिरकले ना अधिकारी. त्यामुळे कार्यालयाचे कुलूप बुधवारीही कायम होते. या प्रकाराबाबत ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. (वार्ताहर)