टाळे लावा आंदोलन...!
By Admin | Updated: June 7, 2017 00:24 IST2017-06-07T00:24:15+5:302017-06-07T00:24:41+5:30
जालना : कर्जमाफी व शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी किसान क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांचा दालनास टाळे लावण्याचा प्रयत्न केला.

टाळे लावा आंदोलन...!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कर्जमाफी व शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी किसान क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांचा दालनास टाळे लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तालुका पोलीस ठाण्यात आणले.
शेतकरी संपास पाठिंबा म्हणून शासकीय व निमशासकीय कार्यालयांना टाळे लावण्याचा इशारा किसान क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील परिसरात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात साध्या वेशातील पोलीसह तैनात केले होते. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास किसान क्रांतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचले. बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोहोचले. घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनास कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना रोखले. जिल्हाधिकारी कार्यालसमोर घोषणाबाजी करत गोंधळ घालणाऱ्या प्रशांत वाढेकर, देवकर्ण वाघ, अरविंद देशमुख, विष्णू मुळे, संदीप ताडगे, धनसिंग सूर्यवंशी, सुरेश गवळी, शिवाजी लकडे, महादेव कदम, देविदास जिगे, अंकुश लकडे, परम्ोश्वर गरबडे आदींना ताब्यात घेऊन पोलिसांनी तालुका ठाण्यात आणले. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा ६९ प्रमाणे कारवाई करून सायंकाळी पाच वाजता सोडून देण्यात आले.