तीन लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: May 8, 2014 23:29 IST2014-05-08T23:26:00+5:302014-05-08T23:29:49+5:30
कळंब : शहरातील द्वारकानगरी वसाहतीत चोरट्यांनी घरफोडी करून रोख २० हजार रूपयांसह सोन्याचे दागिने असा २ लाख, ७६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़

तीन लाखांचा ऐवज लंपास
कळंब : शहरातील द्वारकानगरी वसाहतीत चोरट्यांनी घरफोडी करून रोख २० हजार रूपयांसह सोन्याचे दागिने असा २ लाख, ७६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. पोलिसांनी सांगितले, कळंब शहरातील द्वारकानगरी येथे रो हाऊसेसची वसाहत आहे़ बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी या वसाहतीतील नवनाथ गव्हाणे यांच्या घराच्या पाठीमागील लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला़ देवघरातील कपाटातील कुलूप उघडून प्रवेश केला़ यावेळी नवनाथ गव्हाणे यांच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवून ‘तू गप्प बस अन्यथा भोसकून काढेन’ अशी धमकी गव्हाणे दाम्पत्यास दिली़ तद्नंतर कपाटातील दोन लाख, ५६ हजार रूपये किंमतीचे सात तोळे सोने, रोख २० हजार रूपये असा २ लाख ७६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ या प्रकरणी गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोनि चंद्रकांत सावळे हे करीत आहेत़ दरम्यान, घटनेची वार्ता समजताच शहरासह परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)