शिक्षिकेचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास
By Admin | Updated: February 4, 2017 00:34 IST2017-02-04T00:30:38+5:302017-02-04T00:34:07+5:30
बीड : शहरातील शिवाजीनगर भागात एका शिक्षिकेचे घर फोडून चोरांनी सात लाखांचा ऐवज लंपास केला

शिक्षिकेचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास
बीड : शहरातील शिवाजीनगर भागात एका शिक्षिकेचे घर फोडून चोरांनी सात लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.
आशा झिंगरे या शिक्षिका असून त्या शिवाजीनगर भागातील सरस्वती अपार्टमेंटमध्ये राहतात. बुधवारी त्या कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेल्या होत्या. चोरांनी बंद घर हेरून कुलूपकोंडा तोडला. त्यानंतर कपाटातील सहा लाख ८८ हजार किंंमतीचे दागिने व रोख १० हजार रुपये असा मिळून सहा लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. दरम्यान, घर उघडे असल्याचे निदर्शनास येताच शेजाऱ्यांनी त्यांना संपर्क केला. गावाहून परत आल्यावर झिंगरे यांनी गुरुवारी शिवाजीनगर ठाणे गाठले. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून तपासासाठी दोन पथके नियुक्त केली आहेत. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती कुठलेही धागेदोरे लागले नाहीत. घटनेने भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)