तपासणीसाठी लाखाचे खाद्यतेल जप्त

By Admin | Updated: October 19, 2014 00:20 IST2014-10-19T00:04:33+5:302014-10-19T00:20:41+5:30

उस्मानाबाद : अन्न व औषध विभागाने उस्मानाबाद शहरासह कळंब येथून १ लाख रूपये किंमतीचे खाद्यतेल जप्त केले असून, त्याची तपासणी करण्यात येत आहे़

Lakhakh's edible oil seized for checking | तपासणीसाठी लाखाचे खाद्यतेल जप्त

तपासणीसाठी लाखाचे खाद्यतेल जप्त


उस्मानाबाद : अन्न व औषध विभागाने उस्मानाबाद शहरासह कळंब येथून १ लाख रूपये किंमतीचे खाद्यतेल जप्त केले असून, त्याची तपासणी करण्यात येत आहे़ शिवाय मयदा, खाद्यतेल, दूध, तुपासह इतर खाद्यपदार्थांचे २२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे़
सर्वधर्मियांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांची लगबग सुरू आहे़ दिवाळी साणानिमित्त लागणारे फराळाचे बनविलेले साहित्य खरेदी करण्यावर शहरवासियांचा भर असला तरी ग्रामीण भागातील नागरिक कच्चा माल घेवून घरीच साहित्य बनवितात़ हे साहित्य खरेदीसाठी महिलांसह नागरिकांची बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे़ या कच्च्या मालासह बनविलेले साहित्य निकृष्ठ दर्जाचे असू नये, त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम होवू नये, म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अशोक पारधी, अन्न सुरक्षा अधिकारी व्ही़एस़लोंढे, अन्न सुरक्षा अधिकारी एऩटी़मुजावर यांनी तपासणी मोहीम सुरू केली आहे़ काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद शहर व कळंब शहरातील व्यापाऱ्यांकडील एक लाख रूपयांचे खाद्यतेल अन्न सुरक्षा विभागाने संशयावरून जप्त केले आहे़ याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, काही संशयात तथ्यता आढळल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे़ तसेच मयदा, खाद्यतेल, दूध, तूप, चॉकलेट, आटा यासह स्विटचे जवळपास २२ नमुने घेण्यात आले असून, ते पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ प्रयोगशाळेतील अहवालातून काही दोष समोर आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे़ शहरासह परिसरात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून, व्यवसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Lakhakh's edible oil seized for checking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.