तलाव, बंधाऱ्यांची कामे झाली मंजूर
By Admin | Updated: December 23, 2015 23:36 IST2015-12-23T23:29:51+5:302015-12-23T23:36:34+5:30
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत अखेर लघुसिंचन विभागाच्या पाझर तलाव व सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

तलाव, बंधाऱ्यांची कामे झाली मंजूर
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत अखेर लघुसिंचन विभागाच्या पाझर तलाव व सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मागील काही बैठकांमध्ये हा मुद्दा केवळ चर्चेतच येत होता.
अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते होत्या. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, सभापती अशोक हरण, शोभाबाई झुंझुर्डे, सहेल्याबाई भोकरे आदींची उपस्थिती होती. या सभेत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कामाबाबतही चर्चा झाली. त्यानंतर सर्वानुमते लघुसिंचन विभागाचा आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये लघुपाटबंधारे लेखाशीर्षात २३२ लाखांचे जुने दायित्व दिल्यानंतर ५४.५७ उरले होते. त्याच्या दीडपट नियोजनात कळमनुरी तालुक्यातील घोडा-४८ लाख, औंढा तालुक्यातील अंजनवाडा-४५ लाख असे दोन तलाव मंजूर केले आहेत. आदिवासी उपयोजनेतही एक पाझर तलाव औंढा तालुक्यातील भोसी क्र.२ ला ४८ लाखांची मान्यता दिली आहे. तसेच हिंगोली तालुक्यातील मौजा येथे सिमेंट बंधाऱ्याचे नियोजन केले. यासाठी ४८ लाखांच्या दीडपट म्हणजे ७२ लाखांचे नियोजन केले आहे.
कोल्हापुरी बंधारे सर्वसाधारणमध्ये नियोजनासाठी ११९ .५८ लक्ष उपलब्ध होते. त्याच्या दीडपट १७९ लाखांचे नियोजन केले. यात वसमत तालुक्यातील हयातनगर, कानोसा, हट्टा, औंढा ना. तालुक्यात रामेश्वर, शिरडशहापूर, पुरजळ क्र.१ व २, कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा, देवजना, पाळोदी, हिंगोली तालुक्यात आडगाव, सेनगाव तालुक्यात वरूड चक्रपान, पळशी येथे कोल्हापुरी बंधाऱ्यास मान्यता दिली आहे. तर आदिवासी उपययोजनेत कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी, तोंडापूर क्र.१, २, वारंगा, कुंभारवाडी त. चाफनाथ, धानोरा, हिंगोलीत करंजाळा, औंढ्यात वाळकी येथे कोल्हापुरी बंधारा मंजूर झाला.यामध्ये दायीत्व देवून उरलेल्या ७१.७८ लाखांच्या दीडपट नियोजन केले.
(प्रतिनिधी)